आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाजीचा खून करणाऱ्या मनोरुग्णाचा चाैघांवर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आजीचा खून करून तिचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्यावर हात-पाय शेकणाऱ्या मनाेरुग्णास पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते. तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात अाणले असता या मनोरुग्णाने रुग्णवाहिकेतील दोन रुग्णांसह पोलिस कर्मचारी, रुग्णवाहिका चालकावर प्राणघातक हल्ला केला. त्याचबराेबर रुग्णवाहिकेच्या काचाही फाेडल्या. त्याला रोखण्यास गेलेल्या रुग्णवाहिका मालकाच्या हाताला चावा घेत गंभीर जखमी केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काेटंबी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे संशयित कैलास भगवान भोये (२२) या संशयिताने साेमवारी त्याच्या रखमा राजाराम भाेये (वय ६०) या आजीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बघणाऱ्या चिमीबाई भोये यांनाही त्याने पेटविण्याचा प्रयत्न केला हाेता. सकाळी हरसूल पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अर्धवट जळालेले पाय अाढळल्याने या खुनाची उकल झाली. मृतदेह जाळण्याच्या प्रयत्नात संशयिताचा पाय जळाल्याने पोलिसांनी त्यास अटक केली. दुपारी पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी हरसूल उप रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून (एमएच १५ एबी ७९) चिमीबाईसह अन्य एक महिला रुग्ण आणि संशयित कैलास यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी अाणले हाेते. आनंदवल्ली येथे संशयिताने आरडाओरड करत हाताला लावलेली सलाइन काढली. दोन्ही महिलांना सलाइनची सुई टोचण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारी दीपक खैरनार, चालक भगवान बोरसे यांनी रुग्णवाहिका थांबवत महिलांना जखमी अवस्थेत जेहान सर्कल येथे उतरवले. रिक्षातून त्यांना जिल्हा रुग्णालयात अाणले. पाठोपाठ रुग्णवाहिकाही रुग्णालयात अाली. मात्र, कैलासने रक्तदाब मोजण्याच्या यंत्राने रुग्णावाहिकेच्या काचा फोडल्या. पोलिस कर्मचाऱ्यांनाही तो आवरत नव्हता.

शेख यांच्यामुळे वाचले इतरांचे प्राण
हरसूलपोलिसांनी संशयितास बेडी लावता फक्त एक कर्मचारी त्याच्यासाेबत दिला. नाशकात अाल्यानंतर खून केलेल्या या मनोरुग्णाने दोन महिलांसह पोलिस कर्मचारी, रुग्णवाहिका चालकासह शेख यांच्यावर हल्ला केला. रुग्णवाहिकेच्या काचा फुटण्याचा आवाज आल्याने केजीएन रुग्णवाहिकेचे पाशा शेख यांच्यासह इतर रुग्णवाहिका चालकांनी धाव घेत पोलिस कर्मचारी खैरनार, होमगार्ड आणि रुग्णवाहिका चालक बोरसे यांची सुटका केली. शेख यांनी कैलासला पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने हाताला चावा घेत शेख यांना गंभीर जखमी केले. सुरक्षारक्षकांनी त्यास पकडून मनोरुग्ण वार्डात दाखल केले. शेख यांनी दाखवलेल्या धैर्यामुळेच पोलिस कर्मचाऱ्यांसह हाेमगार्ड इतरांचे प्राण वाचले.

सुदैवाने वाचलो
रुग्णवाहिकेच्या काचा फोडण्याचा अावाज अाल्याने काय प्रकार अाहे, हे बघण्यास गेलो. त्यावेळी संशयित पोलिस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि सुरक्षारक्षकांना मारहाण करत हाेता. रुग्णवाहिकाचालकांच्या मदतीने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने माझ्या हाताला चावा घेतला. सुदैवाने अंगठा वाचला. -पाशा शेख, केजीएन रुग्णवाहिका संचालक
दैव बलवत्तर म्हणून वाचलो
रुग्णालयात नेत असताना अचानक या संशयिताने महिलांवर हल्ला केला. माझ्यासह होमगार्ड, रुग्णवाहिका चालकावर हल्ला केला. इतर चालकांनी त्याचा हिंस्त्र अवतार पाहून त्याला पकडले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच अाम्ही वाचलो. - दीपक खैरनार, हरसूल पोलिस ठाणे.
बातम्या आणखी आहेत...