आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाच्या खून प्रकरणी मनसेच्‍या तेजाळेसह तिघांना कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उत्कर्षनगर येथे दांडियादरम्यान झालेल्या खून प्रकरणी अटकेत असलेला मनसेचा पदाधिकारी किशोर तेजाळे व अन्य दोघांना सोमवारी न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

शनिवारी रात्री खूनाची घटना घडली होती. सचिन सताळे याच्या फिर्यादीनुसार तेजाळे, शैलेश आत्माराम पवार व विकी संजय जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. सोमवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मद्यपींना कोठडी

अपघातात जखमी झाल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या दोन रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातल्याने त्यांना अटक करण्यात आली. अजित विलास बोराडे व विशाल बोराडे हे यांनी मद्याच्या नशेत दुचाकी चालवल्याने ते पारिजातनगर येथील दुभाजकावर आदळले होते.

तिडके कॉलनीत घरफोडी

अमोल देवरे (गार्डन व्ह्यू सोसायटी, तिडके कॉलनी) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरय़ांनी सुमारे 60 हजारांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.