आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचन गार्डन व्यवस्थापनाकडे शहरातील गृहिणींचा कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ग्रामीण भागात सध्या पावसाळापूर्व शेती मशागतीच्या कामांना जोर आला आहे, तसे शहरातही किचन गार्डन विकसित करण्यासाठी गृहिणींनी कंबर कसली आहे. पुरेशी जागा नसली, तरी कुटुंबाच्या गरजेपुरता भाजीपाला पिकवण्यासाठी उद्यान विकास तज्ज्ञांकडे सल्ला घेण्यासाठी गर्दी होत आहे.
बाजारात ताजा, स्वच्छ भाजीपाला मिळेल याची खात्री नसल्याने शहरातील काही चोखंदळ गृहिणींनी कमी जागेत भाजीपाला लागवड केली आहे. पावसाळ्यापूर्वी विविध प्रकारच्या पालेभाज्या बाजारात येतात. याच पालेभाज्या टेरेस किंवा मोकळ्या जागेवर पिकवण्यासाठी गृहिणी किचन गार्डनचे धडे घेत आहेत. फावल्या वेळी व्यवस्थापन केल्यास गरजेपुरता ताज्या पालेभाज्यासह फळपिकेही घेता येत असल्याने गृहिणींचा किचन गार्डनकडे कल वाढत आहे.
वस्तूंचा आणि खतांचा वापर : तुटलेले ट्रे, कुंड्या, ड्रम, पाइप यांसह भिंतीलगतच्या जागेतही पालेभाज्या पिकवता येतात. खतांमध्ये भाज्यांचे निवडलेले काड, टरफले, शिळे अन्न, खरकटे पाणी याद्वारे खते मिळतात.

मसाला पिकांची लागवड :
पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, भेंडी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी यांसह गवती चहा, तुळस, पुदिना, लवंग, वेलदोडे, मिक्स मसाला आदी मसाल्याचे दैनंदिन लागणारी पिके यात लागवड करता येतात.