आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांज्याने कापला असता गळा, बोटाला पडले आठ टाके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - कटलेल्यापतंगाचा नायलॉनचा मांजा दुचाकीस्वाराच्या बोटात अडकल्याने आठ टाके पडल्याची गंभीर घटना रविवारी (दि. ४) दुपारी नाशिक-पुणे महामार्गावर घडली. मांज्यामुळे जखमी होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाही नायलॉन मांजाविक्रेते या मांज्याचे वापरकर्ते आपल्या वर्तणुकीत सुधारणा करण्यास तयार नाहीत.

देवळालीगावातील व्यावसायिक प्रकाश गोकुळदास लोढा (४६) दुचाकीवरून नाशिकरोडहून शिंदे गावाकडे जात असताना महामार्गावरील चेहडी जकात नाक्याजवळ कटलेल्या पतंगाचा नायलॉनचा मांजा त्यांच्या मानेला अडकला. त्यांनी तो डाव्या हाताने बाजूला केला असता तो बोटाला गुंडाळला जाऊन गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर कापलेल्या बोटाला आठ टाके घालावे लागले.

उत्स्फूर्तपणे बंदी घालावी
-नायलॉनचामांजा घातक असल्याने विक्रेते वापरणाऱ्यांनी त्याच्यावर उत्स्फूर्तपणे बंदी घालायला हवी. विक्रेत्यांना सांगून या मांज्याची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात येईल. बंटीकोरडे, जिल्हाध्यक्ष,मनविसे