आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांजा आढळल्यास आता थेट गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नायलॉनमांज्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून, या नायलॉन मांज्यावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे आता थेट तहसीलदारांनाच दुकानांची झाडाझडती घेण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेआहेत. नायलॉन मांजा आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याच्याही सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मांज्याची निर्मिती, विक्री आणि वापर करणाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
२० जानेवारीपर्यंत बंदी

-नायलॉनमांज्याची निर्मिती, विक्री आणि वापरावर २० जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. परंतु, त्याची गंभीरता पाहता जिल्ह्यात कायमस्वरूपी त्यावर बंदीचा प्रशासन विचार करत आहे. कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. लागलीच निर्णय घेतला जाईल. शिवाय, तहसीलदारांना दुकानांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. परंतु, दुकानदारांनीही स्वत:च बंधन पाळत मांज्याची विक्री करू नये. जितेंद्रकाकुस्ते, निवासीउपजिल्हाधिकारी