आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अासारामबापू पूल परिसरात अॅथलेटिक्स प्रशिक्षकावर चाकू हल्ला, गंभीर जखमी; प्रशिक्षणार्थी मुली-मुलांनी धाडसाने दोघांना पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  महिला-मुलीअाणि नागरिकांसाठी माेठी डाेकेदुखी ठरलेल्या गोदापार्क परिसरातील मुजाेर टवाळखोरांची मजल शुक्रवारी (दि. ५) एका अॅथलेटिक्स प्रशिक्षकावर चाकूने हल्ला करण्यापर्यंत गेली. धावण्याचा सराव करणाऱ्या मुलींची छेडछाड काढल्याचा जाब विचारणाऱ्या या प्रशिक्षकाला दोघांनी गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे अाधी भेदरलेल्या काही मुला-मुलींनी नंतर सावरून हिंमत दाखवत एकास, तर स्वत: प्रशिक्षकाने दुसऱ्याला पकडले. दाेघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात अाले. सकाळी ७.३० वाजता आसारामबापू पूल परिसरात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने शहरवासीयांत संताप व्यक्त करण्यात येत अाहेे. संपूर्ण शहरातील टवाळखाेरांना धडा शिकवण्याची वेळ अाता अाली असल्याची सामूहिक भावना व्यक्त करण्यात येत अाहे. 
 
‘दिव्य मराठी’ने गोदापार्कवर धावण्याचा सराव करणाऱ्या मुला-मुलींशी संवाद साधून घडलेला प्रकार जाणून घेतला. गोदापार्कवर नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी कुटुंबियांसह अनेक जण अालेले हाेते. अॅथलेटिक्स कोच वैजनाथ काळे त्यांच्या विद्यार्थ्यांना धावण्याचे प्रशिक्षण देत होते. तीन-चार मुली धावण्याचा सराव करत असताना दोन टवाळखोर तेथे अाले अश्लील भाषेत मुलींची छेडछाड करू लागले. काळे यांनी त्यांना ‘येथे मुलींची प्रॅक्टीस सुरू आहे, तुम्ही येथून जा’, असे सांगितले. त्याचा राग येऊन दोघांनी काळे यांना शिवीगाळ केली. काळे यांनी नम्रपणे त्यांना जाण्यास सांगूनही त्यांनी मुलींची छेडछाड सुरूच ठेवली. त्यामुळेे काळे यांनी अाक्रमक पवित्रा घेतल्यानंतर दोघे काळे यांच्यावर चालून अाले. काळे यांनी प्रतिकार करताच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तरीही काळे आवरत नसल्याने एका संशयिताने चाकूने काळे यांच्या पोटात दोन-तीन वार केले. तोपर्यंत प्रशिक्षण घेणारे मुले-मुली धावत आले. त्यांनी धैर्य दाखवून दुसऱ्या संशयितास पकडले. काळे यांनी गंभीर जखमी हाेऊनही धाडस दाखवत हल्लेखाेर संशयिताला घट्ट पकडून ठेवले. मुलांनी आरडाओरड केल्याने काही नागरिक धावत अाले. जखमी काळे यांना लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही नागरिकांनी पोलिसांना ही घटना कळवल्यानंतर काही वेळाने गंगापूर म्हसरूळ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी आले. घटना म्हसरूळच्या हद्दीत घडल्याने संशयित टवाळखोरांना त्या पथकाने ताब्यात घेतले. चौकशीमध्ये संशयितांची नावे समीर यशवंत कांबळे (वय २१, रा. पोकार कॉलनी, म्हसरूळ) नयुश कैलास कडलग (वय २०, रा. कडलग मळा, आनंदवल्ली) अशी निष्पन्न झालीी. दोघांच्या विरोधात प्रणाघातक हल्ला केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. 

गोदापार्कवर कारवाईचा विसर 
पोलिसांकडून गोदापार्क आसारामबापु पूल परिसरात कारवाईचा निव्वळ फार्स केला जातो. ३१ डिसेंबर अाणि विविध डे च्या दिवशी पोलिसांकडून येथे गस्त केली जाते. ही गस्त नियमित होत नसल्याने टवाळखोरांचा उद्रेक वाढला आहे. गंगापुर आणि म्हसरुळ पोलिसांकडून अद्याप गस्तीसाठी पुढाकार घेऊन कारवाई केली जात नसल्याने वरिष्ठ निरिक्षकांवर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

गोदापार्क परिसरात २४ तास गस्त 
^गोदापार्क परिसरात पोलिसांची २४ तास गस्त वाढवण्यात आली आहे. टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाणार आहेे. परिसरात साध्या गणवेशातील पोलिस गस्त घालणार आहेत. संशयितांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -लक्ष्मीकांत पाटील, पाेलिस उपआयुक्त 

धावण्याअाधी गाेळा करताे मद्याच्या बाटल्या 
^प्रशिक्षणासाठी रोजसकाळी गोदापार्कवर येताे; मात्र सकाळी धावण्याच्या सरावापूर्वी मद्याच्या बाटल्या गोळा कराव्या लागतात. मुलींची छेडछाड करत असल्याने सरांनी त्यांना हटकले तर त्यांनी हल्ला केला. -शुभम जाट, प्रत्यक्षदर्शी 

रायडर्समुळे सरावात येताे व्यत्यय 
^भरधाव वेगातदुचाकी चालवल्या जात असल्याने सरावाला व्यत्यय येतो. जॉगिंग ट्रॅकवर रोजच टवाळखोरांकडून असा उपद्रव सुरू असतो. येथे नियमित पोलिस गस्त होत नाही. -मंगेश शहाणे जयराम भोये, प्रत्यक्षदर्शी 

मुलांची सुरक्षा धोक्यात 
^जॉगिंग ट्रॅकसह पार्कवर टवाळखोरांचा त्रास वाढत आहे. मुला-मुलींसाठी हा परिसर खूप असुरक्षित झाला आहे. प्रशासनाने खेळाडू मुलांसाठी चांगले मैदान आरक्षित करावे. निदान तेथे तरी त्यांना सुरक्षित सराव करता येईल. -डॉ. दीपक खैरनार, शिक्षक 

सरांमुळे आमचे मनोबल वाढले 
^सरांनीअाम्हालाधावण्याच्या प्रशिक्षणासोबत मुलींनी आपले स्वरक्षण कसे करावे याचेही मार्गदर्शन केलेले असल्यामुळे आमचे मनोबल वाढले. त्यामुळेच एका टवाळखोराला पकडू शकलो. -लावण्या खैरनार, प्रत्यक्षदर्शी 

मुला-मुलींनी दाखवलेल्या धैर्याने वाचलो 
^टवाळखाेरमुलींनाबघून अश्लील भाषेत शेरेबाजी करत होते. त्यांना समजावत असतानाच चाकूने हल्ला केला. मुला-मुलींनी धैर्य दाखवत दुसऱ्याला जागेवरच पकडून ठेवले. एकास मी पकडून ठेवले. मुलांच्या धैर्याने सुदैवाने वाचलो. -वैजनाथ काळे, जखमी प्रशिक्षक 

टवाळखोरांवर कडक कारवाई व्हावी 
^गोदापार्कयेथेधावण्याचा सराव करण्यासाठी खेळाडू येतात. टवाळखोरांमुळे त्यांचा सराव होत नाही. मुलींना असुरक्षित वाटते. प्रशिक्षकावर हल्ला होणे गंभीर बाब आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.- कविता राऊत, अांतरराष्ट्रीय धावपटू 

कशा तयार हाेतील ‘कविता राऊत’? 
^धावण्याचासरावकरण्यासाठी येणाऱ्या मुलींची टवाळखोरांकडून नेहमीच छेडछाड केली जाते. अाज काळे सरांनी जाब विचारला तर दोघांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. अशी मनाेवृत्ती असेल तर ‘कविता राऊत’ कशा तयार होतील? -मधुरा जोशी, प्रत्यक्षदर्शी 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार 
प्रशिक्षकावर हल्ला झाल्याने बाजूलाच जॉगिंग करणारे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी नागरिकांमध्ये येऊन संशयितांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे पाठपुरावा करीत यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत दिलासा दिला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे अाश्वासन त्यांनी दिले. 
बातम्या आणखी आहेत...