आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुधाचे दर ८० रुपयांवर, ३० हजार लिटरची विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एरवी ५० ते ६० रुपयांपर्यंत विक्री होणारे दुधाचे दर शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने ८० रुपयांवर गेले होते. गेल्या वर्षी दुधाचे दर ७० रुपयांपर्यंत गेले होते. शनिवारी(दि. १५) कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी ८० रुपयांवर जाण्याची पहिलीच वेळ असल्याचे दूधविक्रेत्यांकडून सांगण्यात आले. जुने नाशिक येथील दूधबाजार भागात ३० हजार लिटर दुधाची विक्री झाली.
शनिवारी(दि. १५) कोजागरी पौर्णिमेनिमित्ताने सकाळपासून दुधाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. सकाळी दूधबाजारात ६५ रुपयांपासून दुधाच्या दराला सुरुवात झाली, ती ७० रुपयांपर्यंत पोहोचली. गंगापूररोड, वडाळारोड, पंचवटी परिसरात, सिडको सातपूर भागातही दुधाचे दर ६५ ते ७० रुपयेच होते. मात्र, सायंकाळी वाजेपासूनच दूधबाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्यास सुरुवात झाल्याने दुधाचे दर ७५ पासूनच सुरू झाले. तसेच, दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ८० रुपयांवर दुधाचे दर पोहोचले. इतर भागातही सायंकाळी दुधाचे दर ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतरही दूधबाजारात ग्राहकांनी रांगा लावून दुधाची खरेदी केली.

मागणी वाढल्याने दर वाढले : कोजागरीनिमित्तानेदरवर्षी दुधाची मागणी वाढल्याने दर वाढतात. मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त मागणी असल्याने दर ८० रुपयांपर्यंत गेल्याचे दूध विक्रेते अन्वर कोकणी यांनी सांगितले.
मोहरम, कोजागरी एकत्र
मोहरम पर्वामुळे शहरात ठिकठिकाणी दूध वाटप केले जात आहे. जुने नाशिक परिसरात विविध मंडळांकडून आतापर्यंत दोन हजारहून अधिक लिटर दुधाची ऑर्डर देण्यात आली. त्यात कोजागरी पौर्णिमाही असल्याने दुधाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
काेजागरी पाैर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात अाटवलेले घट्ट, मधुर चवीचे दूध पिण्याची मजा काही अाैरच अाणि त्यातही हे दूध अाधुनिक काळातील गॅसएेवजी लाकडे जाळून अाटवले तर क्या बात है... नाशिकराेडला तरुणांनी शनिवारी रात्री अशा दुधाचा अास्वाद घेतला.
बातम्या आणखी आहेत...