आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राॅम्प्टनचा दीर्घ संप मिटला, कामगार लगेचच कामावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या१०३ दिवसांपासून सुरू असलेला अाणि शहरवासीयांसह उद्याेगविश्वाचे लक्ष लागून असलेल्या अंबड अाैद्याेगिक वसाहतीतील क्राॅम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील कामगारांनी पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मिटला. कामगार उपायुक्तांच्या दालनात तब्बल साडेपाच तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर या संपावर यशस्वी ताेडगा निघू शकला. विशेष म्हणजे, सायंकाळी वाजता बैठक संपल्यानंतर लगेचच वाजता नाशिकमध्ये असलेल्या कामगारांनी कंपनीत रुजू हाेत एक उत्तम अादर्शही उभा केला अाहे. यामुळे क्राॅम्प्टन पुन्हा एकदा जाेमाने सुरू झाली असून, राज्यभरात नाशिकच्या अाैद्याेगिक वातावरणाविषयी एक चांगला संदेश जाणार अाहे.
कामगार उपायुक्त अार. एस. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ‘निमा’चे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, एचअार-अायअार कमिटीचे चेअरमन माेहन पाटील, माजी अध्यक्ष मनीष काेठारी, ‘अायमा’चे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गाेपाळे, सुरेश माळी, क्राॅम्प्टनच्या एचअार विभागाचे कंट्री हेड शशी रंजन, अलाेक खरे, मंगेश वागळे, कामगार प्रतिनिधी चंद्रकांत गुरव, शरद पाटील, लाेकनाथ जाधव, दिलीप चित्ते, प्रकाश देशमुख यांच्यात संपावर ताेडगा काढण्याबाबत महत्त्वाची बैठक शुक्रवारी झाली. प्रदीर्घ चर्चेनंतर सर्वमान्य ताेडगा काढण्यात अाल्याने कामगारच नाही, तर उद्याेगविश्वातही अानंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कामगार न्यायालयात ज्या पंधरा कामगारांविरुद्ध कन्टेम्ट पिटीशन दाखल केलेले अाहेत, त्यातील पंधरा कामगारांवर व्यवस्थापन काेणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही व्यवस्थापन हे न्यायालयीन प्रकरण मागे घेईल.

कामगारांनी कामावर रुजू हाेऊन कंपनीमध्ये शिस्तीचे पालन करून उत्पादन द्यावे काेणतीही अशांतता निर्माण हाेणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, व्यवस्थापनाने कामगारांना प्रेमाची वागणूक द्यावी त्यांचे काेणत्याही प्रकारे खच्चीकरण हाेणार नाही, याची काळजी घ्यावी.

सध्या ज्या २७ कामगारांना व्यवस्थापनाने निलंबित करून खातेनिहाय चाैकशी सुरू केली अाहे, त्या सर्व कामगारांना व्यवस्थापनाने कामावर रुजू करून घेऊन चाैकशी पूर्ण करावी चाैकशीअंती कामगारांना गंभीर शिक्षा करता चाैकशीत ते दाेषी अाढळल्यास साैम्य शिक्षा करावी अाणि कंपनीत साैहार्दाचे वातावरण निर्माण करावे.