आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचे तुकडे करून विकास हाेणे अशक्य - कृष्णकांत भाेगे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक महापालिकेत चिरकाल स्मरणात राहील असे कामकाज केलेले तत्कालीन अायुक्त कृष्णकांत भाेगे यांनी शहरात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविले. ठाणे अाैरंगाबाद महापालिकेतही त्यांनी अायुक्त म्हणून तर चंद्रपूरमध्ये तेजिल्‍हाधिकारी म्हणून कार्यरत हाेते. पुणे येथे नाेंदणी महानिरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली अाहे. नगरनियाेजनातील अभ्यासक अशीही त्यांची अाेळख अाहे.

विभक्तीकरणाच्या विराेधातच शिवसेनेची भूमिका असते. सिडकाे अाणि सातपूर महापालिकेची मागणी भावनिक पातळीवर केली गेली अाहे. परंतु, पालिकेचे विभाजन करणे हा त्यासाठीचा पर्याय नाही. सिडकाे, सातपूरच्या विकासासाठी निधी कसा वाढवून देता येईल, याचा प्रशासकीय पातळीवर विचार हाेऊ शकताे. यासंदर्भात सेनेच्या वतीने जनभावना लक्षात घेतली जाणार अाहे. परंतु, पालिका विभक्त हाेणार नाही, हीच अामची भूमिका अाहे. अखंड महाराष्ट्रासाठी लढा उभारताना सेनेने यापूर्वीही स्वतंत्र विदर्भाला विराेध केला अाहे. त्याचप्रमाणे सिडकाे अाणि सातपूर महापालिकेच्या प्रस्तावाच्या बाबतीतही अामची भूमिका स्पष्ट अाहे. {अजयबाेरस्ते, महानगरप्रमुख,शिवसेना

काेणत्याही शहराचा समताेल विकास हाेणे गरजेचे असते. एकाच भागाचा विकास झाला अाणि अन्य भागांकडे दुर्लक्ष झाले तर जनक्षाेभ हाेणे ही स्वाभाविक प्रक्रिया अाहे अाणि त्यात गैर काही अाहे असे मला वाटत नाही. परंतु, अन्याय हाेऊ नये, यासाठीची व्यवस्था उपलब्ध असताना शहराचे विभाजन करणे याेग्य हाेणार नाही. तसा काेणी प्रयत्न केला तर नाशिक महापालिका अाणि सिडकाे-सातपूर महापालिका यांची सीमारेषा कुठल्या अाधारे ठरविणार, हा प्रश्न प्रथमत: उपस्थित हाेईल. नाशिकमधील सर्वच परिसर एकमेकांमध्ये इतके गुंतले अाहेत की, त्यांना विभक्त करणे अशक्यप्राय बाब अाहे. शिवाय, सिडकाे अाणि सातपूरला वेगळे केले तर महापालिकेला उत्पन्नाचा दुसरा काेणता स्त्राेत उपलब्ध राहणार याचाही विचार करणे क्रमप्राप्त ठरते. महापालिका जितकी छाेटी तितका खर्च अधिक ही बाब विभाजनाची मागणी करणाऱ्यांनी समजून घ्यायला हवी. अाज महापालिकांना अास्थापना खर्चावर िनयंत्रण ठेवताना नाकीनऊ येते. अशा परिस्थितीत नव्याने स्थापन केलेल्या छाेट्या स्वरूपाच्या महापालिकांना हा खर्च डाेईजड झाल्यास नवल. अाज सिडकाे अाणि सातपूरसाठी स्वतंत्र महापालिकेचा प्रस्ताव समाेर अाला अाहे. उद्या सिडकाेमधील एखाद्या भागाचा विकास पूर्णत: झाल्यास या भागातही स्वतंत्र महापालिकेची मागणी केली जाईल.
खरे तर शहराचा समताेल विकास हाेण्यासाठी पाच वर्षांचा विकास अाराखडा तयार असणे गरजेचे अाहे.

कळवा अापले मत?
सिडकाे-सातपूरस्वतंत्र महापालिका करण्याच्या प्रस्तावाबाबतचे अापले मत ९९७५५४७६१६याक्रमांकावर एसएमएसकिंवा व्हाॅटसअॅप करून अथवा mydivyamarathi@gmail.com या इमेलवर पाठवा. या प्रस्तावावरील सविस्तर प्रतिक्रीया वरील इमेलवर तसेच िलखित स्वरूपात संपादकीयविभाग, ‘िदव्यमराठी’, प्लाॅटनंबर १, शीतल अॅव्हेन्यू, चांडक सर्कल, नाशिक या पत्त्यावर पाठवाव्यात.