आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KTHM College For No Vehicle Day On Every Saturday

केटीएचएम कॉलेजमध्ये इंधन बचतीचा संकल्प, दर शनिवारी ‘नो व्हेइकल डे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘दिव्य मराठी’च्या ‘या बिंदूचा सिंधू होवो’ या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत केटीएचएम महाविद्यालयात ‘नो व्हेइकल डे’ राबविण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह सात ते आठ हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत इंधन बचतीचा संकल्प केला.

या उपक्रमामुळे महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये अपवादात्मकही वाहन नसल्याचे पाहावयास मिळाले. इंधनाच्या बचतीसाठी महाविद्यालयाने आठवड्यातून एक दिवस म्हणजेच, दर शनिवारी ‘नो व्हेइकल डे’ उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. उपक्रमाला पहिल्या टप्प्यातच 70 ते 80 टक्के प्रतिसाद मिळाला असून, पाच ते सहा हजार वाहने बंद राहिली. त्यामुळे जवळपास एक लाख रुपयांच्या इंधनाची बचत झाल्याचा अंदाज प्राध्यापकांनी वर्तविला.

इंधन बचतीचा संकल्प

इंधन बचत काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ‘नो व्हेइकल डे’ उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.
डॉ. दिलीप धोंडगे, प्राचार्य, ‘केटीएचएम’

आरोग्य होईल सुदृढ

प्रत्येक ठिकाणी वाहनानेच प्रवास करण्याची सवय आरोग्यास घातक आहे. सुदृढ आरोग्यासाठी चालणे गरजेचे आहे. प्रा. बी. जे. भंडारी, ‘रासेयो’ विभाग

पायी प्रवास करणार

कॉलेजपासून माझे घर जवळच असल्याने इंधन बचत करण्याच्या उद्देशाने मी रोज कॉलेजला चालत येते.
पूनम सूर्यवंशी, विद्यार्थिनी