आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा कक्षाचा बहुतांश निधी भाडेशुल्कावरच होणार खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी कुंभमेळ्यात येणा-या भाविकांच्या वाहनांचे नियोजन शहराबाहेरच केले जाणार असल्याने या वाहनतळाच्याच ठिकाणी सर्व खाण्या-पिण्याच्या वस्तूंची सुविधा करावी लागणार आहे. त्यामुळे वाहनतळासाठी भरपूर जागा आवश्यक असून, ती कायमस्वरूपी
संपादित करण्याची आवश्यकता नसल्याने कुंभमेळा कक्षाला अर्थात जिल्हा प्रशासनाला मिळणा-या निधीपैकी बहुतांशी खर्च हा नियोजित वाहनतळाच्या भाडेशुल्कावरच खर्च
होणार आहे.

सिंहस्थासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरात येणा-या वाहनांना शहराबाहेरच वाहनतळ उभारण्यात येणार आहे. नाशिकसाठी वाहनतळाची जागा महापालिकेने, तर त्र्यंबकेश्वरची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध करून द्यावयाची आहे. त्या जागेचे भाडे मात्र जिल्हा प्रशासनाच्या निधीतून दिले जाणार आहे. मुख्य पर्वण्यांच्या एक महिनाआधी आणि एक महिन्यानंतरच्या कालावधीसाठी हे वाहनतळ राहण्याची शक्यता आहे. त्याचे दर मात्र अद्याप निश्चित करण्यात आले नसल्याचे मेळा अधिकारी उदय किसवे यांनी सांगितले.

नाशिकची जागा निश्चितीसाठी दोन दिवसांत पाहणी
नाशिक शहरात येणा-या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी वाहनतळाची निश्चिती अद्याप झाली नाही. दोन दिवसांत ती केली जाणार आहे. त्यानंतर त्याचे दर निश्चित होतील. त्यात विल्होळी परिसरात, सिन्नर मार्गावर शहराच्या बाहेर, औरंगाबाद रस्त्यावर, मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव परिसरात, दिंडोरी रस्त्यावर आणि पेठ-धरमपूर मार्गावर तसेच गंगापूर-गिरणारे रस्त्यावरही वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

त्र्यंबकच्या चार जागा निश्चित
त्र्यंबकेश्वरसाठी चार ठिकाणी जागांची निश्चिती झाली आहे. त्यात इगतपुरीकडून येणा-या
भाविकांसाठी पहिने, नाशिककडून येणा-यांसाठी खंबाळे, पेंगलवाडी, आणि आंबोली-सापगाव या चार ठिकाणांचा समावेश आहे.