आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिंहस्थ स्पेशल’ला प्रतिसादच नाही; एक साधू आणि ३० भाविकांचाच प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला भाविकांना उपस्थित राहण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिंहस्थ स्पेशल गाडीतून फक्त एक साधू आणि ३० भाविकांचे मंगळवारी नाशिकरोडला आगमन झाले. नाशिक त्र्यंबकेश्वरला भरणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने राज्य, परराज्यातील भाविकांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या सिंहस्थ स्पेशल सोडण्याचा निर्णय घेतला. मंगळवारच्या कुंभध्वजारोहण सोहळ्यात भाविकांना सहभागी होण्यासाठी हावडा ते नाशिकरोडदरम्यान प्रत्येकी सहा फे-या सुरू केल्या. हावडा येथून १२ रोजी पहिल्या सिंहस्थ स्पेशल गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. वेळेत सुटलेली स्पेशल गाडी सोमवारी सायंकाळी ७.२५ वाजता येणे अपेक्षित होती. मात्र, गाडी तब्बल सव्वासात तास उशिराने म्हणजे रात्री सव्वादोन वाजता नाशिकरोड स्थानकावर पोहोचली.

शुभारंभालाही प्रतिसाद नाही
शुभारंभाच्या हावडा ते नाशिकरोड सिंहस्थ स्पेशल गाडीतून काल रात्री सव्वादोन वाजता फक्त एक साधू तीस भाविकांचे आगमन झाले. पहिल्या गाडीतून मोठ्या संख्येने साधू येणार असल्याच्या चर्चेमुळे गाडीच्या ७.२५ या नियोजित वेळेत नागरिक गाडीची आतुरतेने वाट बघत होते. गाडीला उशीर झाल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. इगतपुरी-ओढा-इगतपुरी सकाळी ९.३० वाजता आलेल्या गाडीतून ३०, सकाळी ९.४५ वाजता आलेल्या भुसावळ-नाशिकरोड गाडीतून शंभर भाविकांचे नाशिकरोडला आगमन झाले.
नाशिकराेडवरून गेलेल्या भुसावळ गाडीतून मात्र ९००, तर इगतपुरी-अाेढा-इगतपुरी गाडीतून १०० प्रवासी नाशिकराेडवरून रवाना झाले. रेल्वेने पहिल्या टप्प्यात हावडा ते नाशिकराेड भुसावळ ते नाशिकराेड इगतपुरी-अाेढा-इगतपुरी भुसावळ-नाशिकराेड या सिंहस्थ स्पेशल गाड्या सुरू केल्या. मात्र, स्पेशल गाड्यांच्या पहिल्या फेरीला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही.

तिकीट विक्री केंद्र कार्यान्वित
रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील सिन्नरफाटा बाजूकडे रेल्वेने भाविकांच्या साेयीसाठी उभारलेले नवीन तिकीट विक्री केंद्र मंगळवारपासून कार्यान्वित झाले. पहिल्याच दिवशी १७ अारक्षण ११ तिकिटांची विक्री झाली. नवीन केंद्राला पाच खिडक्या असून, तेथे ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे.