आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीस्नान अन‌् वाद.. एक नवी परंपरा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अामचीही परंपरा... अामची ती परंपरा... असा उद्घाेष साधुग्राममध्ये नित्याने एेकायला मिळताे. याच परंपरेला अाता शाहीस्नान अन् वादाचीही जाेड मिळाली अाहे. शुक्रवारी तिसरे शाहीस्नान पार पडले. या स्नानावेळीही ही परंपरा कायम ठेवत प्रत्येक अाखाड्याच्या महंतांनी अापला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात सामान्यांसमाेर हसू करून घेतलं.

१८ सप्टेंबर २०१५ : तिसऱ्यापर्वणीत अाखाड्यांनी स्नानावर बहिष्कारास्त्र उगारत प्रशासनाशीच वाद घातला. दुसरीकडे इंदाेर-डाकाेर वारकरी खालशाने स्नानासाठी घुसखाेरीचा प्रयत्न केला.
इतर वाद अन् महंत

कुंभमेळ्याच्याप्रारंभीच अाखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज की नरेंद्रगिरी महाराज असा वाद झाला.

मुख्य ध्वजाराेहणप्रसंगी त्रिकाल भवन्ता यांनी थैमान घातले.
दिगंबर अाखाड्याने पंचायत बाेलवत ग्यानदासांचे नेतृत्वच अमान्य केले.
महंत जन्मेन्जयशरणजी यांच्या अयाेध्याधाम कॅम्प खालशात इंद्रदेव यांचा पदवीदान सभारंभ हाेता. पण, कथावाचक इंद्रदेव हे शैव असल्याने ‘दिगंबर’च्या महंतांनी हा साेहळाच पिटाळला.
परवानगी नाट्यातून जंगलीदास महाराजांच्या शाेभायात्रेत अाखाड्यांनी दहशत माजवली.
बडा लक्ष्मीनारायण मंिदराचे महंत रामस्नेहीदास महाराज यांनी ट्रस्टची काही जागा अाखाड्यांच्या साधूंना दिली नसल्याचे निमित्त करून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात अाला हाेता.
अाखाड्यात प्रवेश नाकारल्याने महंत नागा भगवानदास ब्रिजमाेहनदास यांनी न्यायालयात तक्रार केली हाेती. ध्वजाराेहणातील मानापमानातून डाकाेर इंदाेर, तेरहभाई त्यागी, महात्यागी खालशावर दिगंबर अाखाड्याने बहिष्कार टाकला.

२९ अाॅगस्ट २०१५ : पहिल्यापर्वणीवेळी निर्माेही अाखाड्याने मिरवणुकीच्या वेळेचे निमित्त करून दिगंबर अाखाड्यातील १० ते १५ खालशांचे रथ बडा लक्ष्मीनारायण मंदिराजवळ अडवले. काही महंतांनी ‘दिगंबर’च्या रथांची सजावट विस्कटण्याचा प्रयत्न केला.

१३सप्टेंबर २०१५ : दुसऱ्याशाही मिरवणुकीवेळी निर्माेहीनंतर अंतर निर्माण झाल्याने अाणि ‘दिगंबर’ने रथ पुढे केले. त्यामुळे वारकऱ्यांचे रथ मागेच राहिले. त्यांनी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता वाद निर्माण झाला. महंत, पाेलिस अाणि वारकऱ्यांमध्येही बाचाबाची झाली.