आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंभथॉनच्या संकल्पनेसाठी दीडशे जणांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने कुंभथॉन संकल्पनेत सहभागी होऊ इच्छिणाºया दीडशे अभियंत्यांची रविवारी निवड करण्यात आली.
संदीप फाउंडेशन व अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने संकल्पना राबवली जात आहे. त्यासाठी सुनील खांडबहाले, सचिन पाचोरकर, गिरीश पगारे, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया सहकार्य करत आहेत. कुंभमेळ्यासाठी पाणी व्यवस्थापन, निवासव्यवस्था, मार्ग वाहतुकीचे नियोजन, लोकसंख्या नियोजन, मंदिरांची स्थिती यांसह विविध बाबी येणाºया भाविकांना तांत्रिकदृष्ट्या सहजपणे उपलब्ध होण्यासाठी विद्यार्थी व अभियंत्यांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यातील दीडशे जणांच्या संकल्पनांची निवड केली असून, अमेरिकेतील एमआयटी, हॉवर्ड आणि सॅनफोर्ड या विद्यापीठांचे प्राध्यापक-तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी संदीप फाउंडेशनमध्ये येणार आहेत. एमआयटीने सर्व खर्चाची जबाबदारी घेतली असून संदीप फाउंडेशनने सुविधा, जागा, प्रयोगशाळेपासून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रविवारी दुसºया सत्रात एमआयटीचे भारताचे प्रमुख क्षितिज मारवा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्राचार्य पी. एन. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.