आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात साधुग्राममध्ये साध्वींसाठी स्वतंत्र स्थाननिर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभमेळा हा शतकानुशतके साधूंच्या शाहीस्नानाचा मेळा म्हणूनच सर्वज्ञात अाहे. मात्र, यंदाच्या कुंभमेळ्यात या व्याख्येत थाेडासा बदल करून साधू अन साध्वींच्या शाहीस्नानाचा मेळा असा करावा लागणार अाहे. प्रयागमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यापासून या बदलांना प्रारंभ झाल्याचे चित्र अाहे. अाता कुंभमेळ्यातील शाहीस्नानात साधूंप्रमाणेच साध्वींचाही सहभाग राहणार असून, समाजात सर्व स्तरावर हाेत असलेल्या बदलांचेच ते द्याेतक मानले जात अाहे.

प्रयागमध्ये
झालेल्या गत कुंभमेळ्यात प्रथमच साध्वींना स्वतंत्र स्थान देण्यात अाले हाेते. त्यानंतर अाता नाशिक - त्र्यंबकचा कुंभमेळा भरत असून, त्यात बऱ्याच भवतीनभवतीनंतर साध्वींच्या अाखाड्याला स्वतंत्र जागा देण्याची तयारी प्रशासनाने दाखवली अाहे. त्यामुळे सिंहस्थात प्रथमच महिला साध्वींच्या शाहीस्नानाच्या परंपरेला प्रारंभ हाेण्याची शक्यता अाहे.

प्रयागमध्ये झाला शुभारंभ
प्रयागमध्ये २०१३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात सर्वप्रथम महिला संन्यासिनींना स्नानासाठी स्वतंत्र जागा देण्यास प्रारंभ झाला. त्यासाठी साध्वींना विरोध,राेषाचा सामना करावा लागला. त्यावेळच्या साध्वींच्या अध्यक्ष महंत देव्यागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नवलाईचा अनुभव उपस्थित हजाराे साध्वींनी प्रयागच्या संगमावर घेतला हाेता

नाशकात परी अाखाड्याला स्थान
मुख्य स्थान प्रयाग असलेल्या अाणि पुरुषांच्या काेणत्याही अाखाड्याशी संलग्न नसलेला श्री सर्वेश्वर महादेव वैकुंठधाम मुक्तीद्वार परी अाखाडा नावाचा हा अाखाडा अाहे. अाखाड्याच्या संस्थापक अाणि प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता सरस्वती यांनी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने जागेची मागणी केली हाेती. अखेरीस त्या मागणीला फलस्वरूप येऊन त्यांना नाशकात जागा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली अाहेत

वेदमाता गायत्रीला दिला जाताे इष्टदेवतेचा मान
प्रयागच्या कुंभमेळ्यात साध्वी त्रिकाल भवंता सरस्वती यांनी स्वतंत्र अाखाड्याची घाेषणा केली. त्यांनी अादिशक्ती वेदमाता गायत्रीला इष्टदेवता अाणि भगवान दत्तात्रेयाला अाखाड्याचे अाचार्य असल्याचे घाेषित केले अाहे. तसेच, ‘रमता पंच परमेश्वर' पाच स्वतंत्र महिला पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्या कुंभमेळ्यात साध्वी त्रिकाल भवंता सरस्वती यांच्यासह शेकडाे साध्वींनीदेखील संगमावर स्नान केले.

प्रथमच दिले गेले महिलेला महामंडलेश्वर पद
प्रयागच्या गत कुंभमेळ्यात महिला साध्वींच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे पडल्याचे मानले जाते. त्यानुसार, गत कुंभमेळ्यात प्रथमच काेणत्याही एखाद्या अाखाड्याने महिला साध्वीला महामंडलेश्वर पद बहाल केले हाेते. पंचायती महानिर्वाणी आखाड्याने साध्वी वेदगिरी यांना महामंडलेश्वर ही पदवी बहाल करीत नवीन पायंडा पाडला अाहे. बहुतांश अाखाड्यांच्या श्री महंतांनी या साेहळ्याला उपस्थित राहून साध्वींना शाल पांघरली हाेती. साध्वी वेदगिरी या पंजाबच्या लुधियानामधील एका अाश्रमाच्या प्रमुख अाहेत. चार दशकांपासून धर्म अाणि समाजसेवेत याेगदान देणाऱ्या साध्वी वेदगिरी यांच्या अाश्रमाद्वारे अनेक शाळा अाणि हाॅस्पिटलदेखील चालवले जातात.

जुना अाखाड्याने केला नव्या परंपरेचा प्रारंभ
प्रयागच्या कुंभमेळ्यात शैवपंथीय श्री पंचदशनाम जुना अाखाड्याने या नवीन अध्यायाचा शुभारंभ केला अाहे. त्यांनी माई - बाडा नावाने अाेळखल्या जाणाऱ्या साध्वींच्या समूहाला एक स्वतंत्र अाेळख व स्थान दिले. त्यावेळी लखनाैच्या श्री मनकामेश्वर मंदिराच्या प्रमुख महंत देव्यागिरी यांना त्याचे अध्यक्षपद बहाल करण्यात अाले हाेते. गत दशकातील कुंभमेळ्यांपर्यंत त्यांना स्वतंत्र अस्तित्व नव्हते. त्यांचे सर्व अस्तित्व जुना अाखाड्यातच मानले जात हाेते.
बातम्या आणखी आहेत...