आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumbh Mela Issue At Nashik, Latest News In Marathi

त्र्यंबकच्या कचऱ्यावरून मनसेत उडाला भडका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील निर्माल्यासह कचरा नाशिकला आणण्याच्या प्रस्तावाला मनसेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेला विरोध झुगारून मंजुरी देण्याबाबत आयुक्तांना गुरुवारी (दि. १८) महासभेत सर्वाधिकार देण्यात आले. कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्याच्या सूचना महापौरांनी केल्यानंतर संतप्त मनसे नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. थेट महापौरांच्या खुर्चीजवळ जाऊन निर्णय मागे घेण्याची विनंती मनसे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी केली. मात्र, महापौर निर्णयावर ठाम राहिल्याने त्यांनी पत्रकारांशी बोलताना कचऱ्याच्या गाड्या जाळून टाकण्याचा इशारा दिला.
दोन वेळा त्र्यंबक येथील कचरा नाशिकच्या खत प्रकल्पात आणण्याचा प्रस्ताव महासभेने फेटाळला. मात्र, शासनाने पालिकेचा ठराव विखंडित करून हरित लवादातील सुनावणीचा संदर्भ देत कचरा स्वीकारण्यास संमती द्यावी, असे पत्र पालिकेला दिले. त्यानुसार, महासभेत हा प्रस्ताव चर्चेला आल्यावर शिवाजी चुंभळे, सुदाम कोंबडे यांनी खत प्रकल्पातील यंत्रसामग्री गंजली असून, खतनिर्मिती होत नसल्याने कचऱ्याचे डोंगर साचल्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर अजय बोरस्ते, कविता कर्डक, सुधाकर बडगुजर यांनी यंत्रसामग्रीचा वापर करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी भूमिका घेत प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी केली. सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी २६ डिसेंबरला मुख्यमंत्री येत असून, त्यांच्या कानावर हा प्रश्न घालून ही समस्या सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर आयुक्तांनी सभागृहाचे मत शासनापर्यंत पोहोचवून तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घाेषणा दिल्‍या.
सभागृहनेत्यांनाही घेराव
महासभेनंतरसभागृहनेते शशिकांत जाधव यांना हरिभाऊ लाेणारी अन्य नगरसेवकांनी घेराव घालत सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही विरोध करा असे सुनावले असता, गटनेत्यांची समिती स्थापून निर्णय घेण्याचे सुचवल्याचे जाधव यांनी सांगितले.
महापौर अडचणीत
राजठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी नगरसेवकांशी संवाद सुरू केला असतानाच, मनसे नगरसेवकांच्या मनाविरोधात आदेश आल्याने महापौर अडचणीत येण्याची शक्यता आहे. सभागृहात बोलण्याची संधी मिळत नाही म्हणून मनसे नगरसेवक अरविंद शेळके यांनी खंत व्यक्त केली.
मतदानाची मागणी, आरोप-प्रत्यारोप
शाहूखैरे यांनी या प्रस्तावावर मतदानाद्वारे निर्णय घेण्याची मागणी केली. त्यास कोंबडेंसह नगरसेवकांनी उभे राहून अनुमोदन दिले, मात्र महापौर ऐकत नसल्याचे बघून कोंबडे यांनी थेट व्यासपीठाजवळ धाव घेत विषय नामंजूर करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिल्‍यामुळे आंदोलनाचा इशारा दिला.
काझी गढीबाबत चर्चा
काझीगढीच्या संरक्षक भिंतीच्या मुद्यावरून रंजना पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत भविष्यात दुर्घटना झाली तर गढीचे रहिवासीच नाही तर सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांचाही जीव जाईल, याकडे लक्ष वेधले.