आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात भाविकांना मिळणार बसेसचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्यात भाविकांचा प्रवास अधिकच सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन विभागाच्या नाशिक विभागाने विशेष पास योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे भाविकांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

पर्वणी काळात ३३ लाख भाविकांची वाहतूक करण्याचे एसटी प्रशासनाने नियोजन केले असून, त्यासाठी अतिरिक्त सहा हजार बसेस लवकरच उपलब्ध होणार आहेत. या बसेसच्या माध्यमातून भाविकांची ये-जा होणार आहे. सिंहस्थ पर्वणी कालावधीत नाशिक शहर परिसर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात प्रवास करण्यासाठी एसटी प्रशासनाने या विशेष पास योजना जाहीर केल्या आहेत.
१५ आॅक्टोबर ते १४ जून आणि १५ जून ते १४ आॅक्टोबर या दोन्ही हंगामांसाठी सात चार दिवसांच्या पासेसचा लाभ प्रवाशांना घेता येणार असून, आवडेल तेथे प्रवास करता येणार आहे.

सेवा दिवसांच्या दिवसांच्या प्रकार पासचे मूल्य पासचे मूल्य
प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी १४१५ ७१० ८१० ४०५
निमआराम १६३५ ८२० ९३५ ४७०
आंतरराज्य १७६० ८८० १०१० ५०५