आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा नियोजन समितीला स्वागत कमानींचा विसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या स्वागत कमानींचा कुंभमेळा नियोजन समिती महापालिकेला विसर पडला आहे. कुंभमेळ्याच्या कामांमध्येही कमानींच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत असून, कमानी उभारण्याच्या मागणीसाठी शिवसेनाही पालिका जिल्हा प्रशासनाकडे मागणी करणार आहे.

बारा वर्षांपूर्वी तत्कालीन महापौरांनी शहराच्या हद्दीच्या सुरुवातीलाच प्रत्येक मुख्य मार्गांवर स्वागत कमानी उभारल्या होत्या. त्यावर महापालिकेचे चिन्हदेखील लावण्यात आले होते. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात विल्होळी, आडगाव आदी ठिकाणच्या कमानी पाडण्यात आल्या. महामार्ग प्राधिकरण विभागाने या कमानी बांधून देण्याचे अाश्वासन िदले होते. मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. देश-विदेशांतून येणारे नागरिक, पर्यटक भाविकांना स्वागत कमानींमुळे शहरात प्रवेश करत असल्याचे समजत होते. मात्र, कमानींअभावी बहुतांश वाहनधारकांचा इच्छित ठिकाणी जाताना गोंधळ उडतो. आगामी सिंहस्थात येणाऱ्या भाविकांचा विचार करून महापालिकेने अन्य विकासकामांसोबतच स्वागत कमानी बांधण्याची मागणी शिवसेना पदाधिकारी करणार आहेत.
या संदर्भात खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांच्यासह स्थानिक नागरिक जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांना निवेदन देणार आहेत.
नामकरणाचाहीविसरः आडगावच्याकमानीस जिजामाता, विल्होळी-मीनाताई ठाकरे, गंगापूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्र्यंबकरोड- त्र्यंबकराज, औरंगाबादरोड- संभाजी महाराज, तर भगूरच्या कमानीस स्वातंत्र्यवीर सावरकर प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले होते. मात्र, त्याचाही विसर पडल्याचे दिसून येत आहे.
संबंधितांशी चर्चा करणार
स्वागतकमानी शहराची ओ‌ळख आहेत. त्यांना मान्यवरांची नावेदेखील देण्यात आलेली आहेत. मात्र, पाडण्यात आलेल्या स्वागत कमानी पुन्हा उभारण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. याबाबत संबंधितांशी चर्चा करणार आहोत. सुनीलजाधव, पदाधिकारी,शिवसेना