आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंहस्थासाठी कुंभमेळा गोदाप्रेमी सेवा समिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहरातील पंचवटी व गोदाघाट परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सिंहस्थासाठी कुंभमेळा-गोदाप्रेमी सेवा समितीची स्थापना केली आहे. देवांग जानी यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पंचवटी परिसरात झालेल्या विशेष बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी पार पडण्यासाठी व दक्षिणवाहिनी गोदावरी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या. सिंहस्थात जगभरातून येणार्‍या हजारो भाविकांना आपण येथील नागरिक या नात्याने काय मदत करू शकतो, या विषयावर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यासाठी कुंभमेळा-गोदाप्रेमी सेवा समितीची स्थापना करण्यात आली.

प्राचीन १६ कुंडांचे पुनरुज्जीवन, सुशोभीकरण आणि नदीपात्रातील जिवंत पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच शहरातील विविध प्रश्नांवर चर्चाही करण्यात आली.