आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्याच्या तयारीसाठी होतेय कालिका यात्रेतील गर्दीची मोजदाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नवरात्रोत्सवाच्या उत्तरपर्वात कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली असून, दोन वर्षांनी कुंभमेळ्यात ‘फ्लोटिंग’ गर्दी मोजता येण्यासाठी कालिका यात्रेतील ‘वाहत्या गर्दी’ची मोजदाद करण्याचा प्रयोग पोलिसांनी सुरू केला आहे.

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिरात नवरात्रोत्सवामध्ये सर्वाधिक गर्दी होते. त्या गर्दीवर देखरेख ठेवण्यासाठी कालिका विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात सात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. त्या कॅमेर्‍यांमध्ये दर्शनाला येणार्‍या भाविकांची मोजदाद करणे शक्य आहे. त्यामुळे महानगरातील पोलिसांकडून गर्दीची मोजदाद करण्यासाठी या वाहत्या गर्दीपासूनच प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ करण्यात येणार आहे.

गर्दीचे प्रक्षेपण पोलिसांपर्यंत..
कालिका मंदिराच्या आतील भागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवरून पोलिस कक्षात थेट प्रक्षेपण करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना गर्दीची थेट मोजदाद करण्याची पूर्वतयारी करता येत आहे. सतत वाहत्या गर्दीची मोजदाद करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर याचा उपयोग करण्यात येत आहे. अण्णा पाटील, अध्यक्ष, कालिका विश्वस्त मंडळ

वाहती गर्दी मोजणे अवघड
एखाद्या सभेला असलेली गर्दी मोजणे पोलिसांच्या दृष्टीने सोपे असते. कारण, तेथे प्रतिचौरस मीटर जागेत किती व्यक्ती बसतात, त्याचे गणित पक्के असते; मात्र गर्दी वाहती असेल, तर मोजदाद करणे अवघड काम असते. आता कालिका यात्रेच्या माध्यमातून वाहत्या गर्दीच्या नियोजनासाठी त्या गर्दीचा सुयोग्य अंदाज बांधत त्या नियोजनानुसार पुढील कार्यवाही करणे शक्य होणार आहे.