आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामचंद्रांच्या जयघाेषात कावनईत कुंभ महापर्वारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रभूरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन कपिल महामुनींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या श्रीक्षेत्र कावनई येथील कपिलधारा तीर्थावर गुरुवारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण आणि जलपूजनाने कुंभमहापर्वाला आरंभ झाला. तिन्ही अनी आखाड्याचे साधू हजारो भविकांनी केलेल्या ‘बाेलाे सियावर रामचंद्र की जय’चा जयघोषाने हा परिसर दुमदुमून गेला हाेता. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत ग्यानदासजी महाराज यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्राला सिंहस्थाचे मूळ स्थान मानले जाते.
नाशिक, त्र्यंबकेश्वरपाठाेपाठ याठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजाराेहण साेहळ्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या समारंभास पंच दिगंबर आखाड्याचे महंत कृष्णदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, महंत धरदास महाराज, निर्मोही अाखाड्याचे महंत आयोध्यादास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...