आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरे शाहीस्नान : पर्वणीसाठी सुलभ नियाेजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर- वाहनतळासहच इतर ठिकाणी दुचाकींसाठी मार्ग माेकळा असेल, तर दुसऱ्या पर्वणीप्रमाणेच पाेलिस बंदाेबस्त ठेवण्याबराेबर कुशावर्तावरील शाहीस्नानाचा सर्वांनाच विना अडथळा अानंद घेता येईल, असे प्रशासनाने नियाेजन केले अाहे.

कुंभमेळ्यातील त्र्यंबकेश्वर येथील तिसरे शाहीस्नान शुक्रवारी हाेत अाहे. त्यासाठी दशनामी अाखाड्यांसह प्रशासनदेखील सज्ज झाले अाहे. वामनद्वादशीचे विष्णूस समर्पित असणाऱ्या या स्नानपर्वासाठी कुशावर्त परिसर स्वच्छ करण्यात अाला अाहे, तर पालिकेने शहरभर निर्जंतुके फवारणी करून अाराेग्यदायी वातावरणाची निर्मिती केली अाहे. कुशावर्तात स्वच्छ पाणी राहील, याची व्यवस्था जीवन प्राधिकरण पाहत अाहे. वरुणराजानेही हजेरी लावून जिवंत झऱ्यांना संजीवनी दिली अाहे, हे विशेष.

स्थानिक उपजिल्हा रुग्णालय २४ तास रुग्णसेवेसाठी सज्ज असून, अापत्कालीन परिस्थितीत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका तत्पर अाहेत. गल्ली-बाेळात वैद्यकीय सेवा देण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिकांचे नियाेजन असून, वाहनतळ, प्रमुख चाैक, कुशावर्त तीर्थ, मंदिर चाैफुली येथे प्रथमाेपचार केंद्र कार्यान्वित असल्याची माहिती डाॅ. भागवत लाेंढे यांनी सांगितले.

तिसऱ्यापर्वणीप्रमाणेच मिरवणूक दर्शनाची व्यवस्था
दुसऱ्यापर्वणीप्रमाणेच भाविकांना रस्त्याच्या कडेला उभे राहता येणार असल्याने, सर्वांना शाहीमिरवणुकीचे दर्शन घेता येईल. त्यादृष्टीने रस्त्यावरील बॅरेकेडिंगची व्यवस्था केली अाहे. पिण्याच्या पाण्यासह स्वच्छता दिवाबत्तीची व्यवस्था पालिका करीत अाहे. महावितरणतर्फे २४ तास वीजपुरवठा हाेणार अाहे. दरम्यान, मिरवणुकांचा क्रम वेळ ही पहिल्या पर्वणीप्रमाणेच राहणार अाहे. पहाटे ३.४० वाजेपासून ११.५५ वाजेपर्यंत अाखाड्यांच्या शाहीस्नानाचा कार्यक्रम असेल. त्यानंतर कुशावर्त तीर्थ भाविकांसाठी खुले हाेणार अाहे.