नाशिक - सिंहस्थ कुंभमेळा जगभरात पोहोचावा, यासाठी आता शासनानेही संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर कुंभमेळ्याच्या इतिहासासह नाशिकमधील साेयीसुविधांची माहिती देण्यात आली आहे. मिरवणूक मार्ग, भाविक मार्ग, रिंगरोड, साधुग्राम, स्नान घाट, वाहनतळ, प्रशासकीय रस्ते, महत्त्वाचे रस्ते आदींची सविस्तर माहिती नकाशासह देण्यात आली आहे.
सिंहस्थ मेळ्याच्या यशस्वितेसाठी एकीकडे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे विविध खासगी अभियंते कुंभथॉनच्या माध्यमातून तांत्रिक बाबींची निर्मिती करीत आहेत. त्यात विशेषत: संकेतस्थळांची निर्मिती, मोबाइल
अॅप्लिकेशन आदी बाबींचा समावेश आहे. शासनानेही या बाबतीत आघाडी घेतली असून, माहिती जनसंपर्क विभागाकडून https://kumbhmela2015.maharashtra.gov.in हे सुसज्ज संकेतस्थळ तयार करण्यात आले. या संकेतस्थळावर कुंभमेळ्याशी संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नवीन पिढीला ही माहिती निश्चितच उपयाेगी पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एका क्लिकवर...
- कुंभमेळ्याचा परिचय - नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गेल्या वेळी झालेल्या कुंभमेळ्याची माहिती, कुंभमेळ्याचा मूलभूत अर्थ, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून कुंभमेळा
- कुंभपर्व चक्र - हरिद्वार,अलाहाबाद, नाशिक-त्र्यंबकेश्वर, उज्जैन या ठिकाणी होणार्या कुंभमेळ्याची माहिती, गोदावरी दर्शन, कुंभमेळ्याप्रसंगी करण्यात येणारे धार्मिक विधी आदींची माहिती
- परिचय- नाशिकचे स्थान महात्म्य, विविध धार्मिक स्थळांची माहिती
- मार्ग- नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील शाही मिरवणूक मार्ग, भाविक मार्ग, रिंगरोड, साधुग्राम, स्नान घाट, वाहनतळ, प्रशासकीय रस्ते, महत्त्वाचे रस्ते आदींची माहिती नकाशांसह
- निवास- नाशिकआणि त्र्यंबकेश्वर येथील हाॅटेल्स, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे निवासगृहे
- हरित कुंभ-हरितकुंभ संकल्पनेचा कृती आराखडा आणि छायाचित्रे
- स्थळ विशेष- नाशिकिजल्ह्याची माहिती, येथील धार्मिक आणि पर्यटन स्थळे, लगतचे जिल्हे यांची माहिती
- प्रशासन- जिल्हास्तरीय विभाग, मंजूर आराखडा, शासन निर्णय, पत्रव्यवहार
- तक्रारी सूचना- सिंहस्थकामांसंदर्भात संकेतस्थळासंदर्भात काही सूचना वा तक्रारी असल्यास त्यासाठीचा अर्ज
- संपर्क- जिल्हाप्रशासन काही आखाड्यांची नावे पत्ते.