आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा : ध्वजाराेहणाने झाली अास्थेच्या पर्वाला सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभ पर्वाचा शंखनाद... हिंदू धर्मकार्याचा प्रारंभ शंखनादाने करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत अालेली अाहे. सिंहस्थ कुंभ पर्वाच्या पूर्वसंध्येला पुराेहित संघातर्फे नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून काढण्यात अालेल्या धर्मध्वजा शाेभायात्रेत तरुणींनी केलेला हा शंखनाद अाकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. - Divya Marathi
कुंभ पर्वाचा शंखनाद... हिंदू धर्मकार्याचा प्रारंभ शंखनादाने करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत अालेली अाहे. सिंहस्थ कुंभ पर्वाच्या पूर्वसंध्येला पुराेहित संघातर्फे नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून काढण्यात अालेल्या धर्मध्वजा शाेभायात्रेत तरुणींनी केलेला हा शंखनाद अाकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला.
त्र्यंबकेश्वर - सिंह राशीत गुरू सहा वाजून १४ मिनिटांनी प्रवेश करताच मंगळवारी सकाळपासून सिंहस्थ कुंभ पर्वाला प्रारंभ झाला. सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या ध्वजाराेहणाने सुरुवात झाली. ५० किलाे वजनाची पंचधातूची ध्वजपताका तयार केली आहे. या पताकेवर गुरू, सूर्य, चंद्र, गाेदावरी व वाहन मगर, दशदिशा, बारा राशी यांसह अाेम ऱ्हीम, स्वस्तिक अशी चिन्हे अाहेत.

या ध्वजपताकेवर दाेन लाख खर्च झाला अाहे. कुशावर्त तीर्थावर ३१ फूट उंचीच्या खांबावर ही पताका बसवण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अाखाड्याचे महामंडलेश्वर महंत अवधेशानंद यांच्या हस्ते ध्वजपूजन, अाराेहण हाेणार अाहे.
पुढील स्लाइडवर वाचा, आज होणारे कार्यक्रम...