आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभात साधुंच्या एका गटाला वगळल्याचा अाराेप: निधीबाबतही नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संपूर्ण प्रक्रियेपासून अापल्याला वगळण्यात येत असून एका खास गटाला प्राधान्य देऊन सर्व कामांचा फायदा त्याच गटाला मिळवून दिला जात असल्याचा अाराेप, अाद्य संत महंत मंडळ चॅरिटेबल ट्रस्टने मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री अाणि प्रशासनाला निवेदन देऊन केला अाहे.

साधू संतांच्या एका गटाला ७ अाॅगस्ट २०१४ नंतर झालेल्या सर्व बैठकांतून वगळले जात अाहे. तसेच कुंभमेळ्याच्या अायाेजनातील कामांच्या निर्णय प्रक्रियेतून व कामातून सुनियाेजीतरित्या वगळले जात अाहे. एका खास गटाला प्राधान्य देऊन सर्व कामांचा फायदा दिला जात अाहे. कामांचे निर्णय हाेताना एक-दाेन अाश्रमांची कामे हाेत अाहेत. परंतु अन्य साधू महंतांच्या अाश्रमात कामे बिलकूलच झालेली नाहीत. त्यांना साधी विचारणाही झालेली नाही.
प्रशासनातर्फे अशा प्रकारचा भेदभाव कुठल्या अाधारावर केला जात अाहे असा सवालही उपस्थित करण्यात अाला अाहे. कुंभमेळ्यात साधुसंतांच्या अाश्रमातही साधुसंत अाणि अन्य भाविकगण मागील कुंभमेळ्याप्रमाणे येणार अाहेत. नाशिक क्षेत्रातील संत महंत मंडळाच्या २२ अाश्रमांच्या यादीपैकी निधीवाटप करताना कुठल्या अाश्रमाला विचारले गेले अथवा निधी दिला गेला, असा प्रश्न निवेदनात उपस्थित उपस्थित करण्यात अाला अाहे. निवेदनावर महंत शंकरदासजी महाराज, रामशाेभादासजी महाराज, रामप्रसाददासजी काठीया महाराज, रामस्वरुपदासजी महाराज, श्यामसुंदरदाजी महाराज, महंत विशंभरदासजी महाराज, रामशेभादास महाराज अादींची नावे अाहेत.
रामायण काळातील मंदिरेही दुर्लक्षित
रामायण काळाचा वारसा सांगणाऱ्या मंदिरांसाठी एक पैसाही निधी मिळालेला नसल्याचे ट्रस्टने म्हटले अाहे. यात सरदार चाैकातील राम मंदिर, सातपूर येथील कानिफनाथ मंदिर, त्र्यंबकराेडचे राजराजेश्वर राम मारुती मंदिर, खंबाळे येथील हनुमान मंदिर, म्हसरुळ येथील ब्रजेश्वरी माता मंदिर, तपाेवनातील लक्ष्मणजी मंदिर, रामपर्णकुटी, राम लक्ष्मण भेट मंिदर, साक्षीगाेपाळ मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात अाला अाहे.