आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारांतच कोलमडले नियोजन, लाखोंची पर्वणी पेलण्याचा पेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पुष्कर मेळाव्यातील चेंगराचेंगरीत मंगळवारी २७ जणांना जीव गमवावा लागला. गेल्या कुंभमेळ्यात नाशकातही चेंगराचेंगरीत ३३ जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर नदिान यंदा तरी सक्षम नियोजन अपेक्षित असताना ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनातच यंत्रणा कोलमडल्याचे चित्र भविष्यात काय वाढून ठेवले आहे, त्याचा अंदाज देणारे ठरले. पर्वणींसाठी परिपूर्ण नियोजन झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी तो किती वास्तव आहे, हेही दिसले. ध्वजारोहणासाठी आलेल्या हजारोंच्या गर्दीचे नियंत्रण करताना प्रशासनाची उडालेली तारांबळ बघता ही व्यवस्था लाखोंच्या गर्दीला कशी सांभाळणार, असा सवाल उपस्थित करून गेली. या नियोजनाचा फटका लोकप्रतिनिधींसह सामान्यांनाही बसला. शाहीस्नानाची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या सोहळयात प्रशासनाच्या अनेक उणिवा समोर आल्या. त्यामुळे नदिान मुख्य पर्वण्यांच्या काळात तरी पोलिसांना आणखी प्रचंड तत्परता दाखवावी लागणार असल्यावर ‘डी.बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
- गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश
- वेळीच बोध घेत आगामी पर्वणी काळात सुधारणा करणे गरजेचे...
- ध्वजारोहणसोहळ्यात प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याबाबत पुढे काय उपाययोजना करणार?

ध्वजारोहणसोहळयात पोलिस, प्रशासन वा अन्य विभागाला आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
- शाहीस्नानादरम्यान शहरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. त्यासाठी कोणते नियोजन केले आहे.

सिंहस्थकुंभमेळा तसेच, शाहीस्नानादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, गर्दी व्यवस्थापनासाठी त्या-त्या विभागाने नियोजन केले आहे. तसेच, पर्वणीच्या काळात सेक्टरप्रमाणे संपर्क अधिकाऱ्याची नेमणूकही करण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यालामंगळवारी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, केंद्रीयमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. हा सोहळा अनुभवण्यासाठी असंख्य भाविकांनी गोदाकाठावर पहाटे वाजेपासूनच गर्दी केली होती. कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाची रंगीत तालीम म्हणून ध्वजारोहण सोहळा ओळखला जातो. या सोहळ्यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजनही केले होते. मात्र, प्रत्यक्षात सोहळ्याप्रसंगी लोकप्रतिनिधी, महत्त्वाच्या व्यक्तींसह भाविकांनाही नियोजनातील उणिवांमुळे फटका बसला. या सोहळ्यासाठी आलेल्या सुमारे २० हजार भाविकांच्या समुदायावरील नियंत्रणासाठी प्रशासनाला नियोजनानंतरही मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले. मंगळवारी गोदाकाठ परिसरात गर्दी व्यवस्थापनासाठी बॅरिकेड‌्स लावण्यात आले होते. मात्र, येणाऱ्या भाविकांना, माध्यम प्रतिनिधी, राजकारणी तसेच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश काेठून द्यावयाचा यासह अनेक गोष्टींबाबत पोलिस संबंधित कर्मचाऱ्यांना पुरेशी माहितीच नसल्याचे दिसून आले. परिणामी, या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांसह नागरिकांतही मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला.

गेल्यासिंहस्थात चेंगराचेंगरी
नाशिकमध्ये२००३मध्ये झालेल्या सिंहस्थात पर्वणीच्या वेळेस सरदार चौकात चेंगराचेंगरी होऊन ३३ भाविकांचा बळी गेला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सिंहस्थाच्या संपूर्ण नियोजन, पुरेशा बंदोबस्तात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यावर प्राधान्य दिले जात आहे. मात्र, ध्वजरोहणाप्रसंगी उद‌्भवलेल्या अनेक अडचणी, झालेली गैरसोय यातून धडा घेत प्रशासनाने आगामी सिंहस्थ पर्वणीकाळात तरी योग्य सुधारणा करण्याची गरज आहे. ध्वजारोहणातील गर्दी लक्षात घेऊन आतापासूनच प्रशासनाने योग्य नियोजन करून त्यादृष्टीने पाऊले उचलण्याची गरज आहे.

वाहतूककोंडीचाही फटका : ध्वजारोहणालाउपस्थित भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था कुठे याची माहितीच नसल्याने अनेकांची दिशाभूल झाली. अनेक वाहनचालकांची शोधाशोध सुरू होती. सोहळा संपल्यानंतर वाहने काढण्यासाठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. या कोंडीने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचनि्ह उपस्थित केले.

उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत
ध्वजारोहणाच्यासोहळ्यात गर्दी नियंत्रित करण्यात कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. तसेच, आगामी पर्वणी काळात येणाऱ्या नागरिक भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे. अवनिाशबारगळ, पोलिस उपायुक्त

बॅरिकेड‌्सचे प्रश्नचनि्ह
गर्दीनियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून २५ किलोमीटर अंतरापर्यंत बॅरिकेड‌्स लावले जाणार आहेत. मात्र, शाही पर्वणी काळात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी हे बॅरिकेड‌्स कितपत उपयोगी ठरू शकतील, याबाबत साशंकताच आहे. तसेच, बंदोबस्त नियोजनासाठी इतर ठिकाणांहून दाखल झालेल्या नवख्या अधिकाऱ्यांना शाहीमार्ग, भाविक दाखल होण्याचे मार्ग, आपत्ती घडल्यास हॉस्पिटल, शासकीय कार्यालये इत्यादींबाबत पुरेशी माहिती नसल्याने याचाही प्रशासनाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जितेंद्र काकुस्ते, निवासीउपजिल्हाधिकारी
गोदाघाट परिसरातील अतिक्रमण ‘जैसै थे’

सिंहस्थपर्वणी काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता गोदाघाट परिसरातील भाजीबाजार स्थलांतरित करण्यात आला आहे. तर, रामकुंड परिसरातील अतिक्रमण मोठा विरोध होऊनदेखील हटविण्यात आले. मात्र, अद्यापही या परिसरातील काही अतिक्रमणे ‘जैसे थे’च असल्याने भाविकांना मार्गक्रमण करण्यासाठी अथवा त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या भागातील अतिक्रमणेदेखील महापालिका प्रशासनापुढे आव्हान ठरत आहेत. याबाबतही प्रशासनाने वेळीच विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

अनुभवी अधिकाऱ्यांची प्रशासनाला होईल मदत
गेल्यासिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर व्ही. रमणी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. यंदाच्या कुंभमेळ्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या आयोगाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कुंभमेळ्यात व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांचाही नियोजन करताना मोठा उपयोग होणार असल्याने, प्रशासनातर्फे अशा अधिकाऱ्यांना पाचारण केल्यास प्रशासनाला मदतच होणार आहे.

रामकुंड परिसरात मार्गदर्शक फलक लावण्याची गरज
रामकुंडपरिसरात भाविकांच्या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन फलक नसल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तच नसल्याने नागरिकांनी कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी बॅरकेट्स ओलांडण्याचाही प्रयत्न केला. यातून वाद निर्माण होऊन किरकोळ धक्काबुक्कीचे प्रकारही घडले. अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे पर्वणी काळात चेंगराचेंगरीसारखे प्रकारही होऊ शकतील, त्यामुळे लहानात लहान प्रकाराकडेही गांभीर्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक फलक लावल्यास भाविकांचे याेग्य प्रबाेधन होईल.
बातम्या आणखी आहेत...