आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभपर्व: नाशिकमधील शाहीस्नानाला धाेक्याची घंटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणा-या शाहीस्नानातच बाधा आली, तर त्याचे काय परिणाम हाेतील, त्याचा विचार प्रशासनाने आतापासूनच करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रस्तावित नवीन शाहीमार्गाला असलेला विराेध मावळल्यासारखे चित्र निर्माण करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. त्याबाबत नाशकात येणा-या तिन्ही आखाड्यांच्या महंतांकडून ‘ना हरकत’चे पत्रदेखील प्रशासनाला प्राप्त झाले आहे. मात्र, नाशकातील तीन शाहीस्नानांपैकी काेणत्याही स्नानावेळी अचानक प्रचंड पावसासह पूर आल्यास गाडगे महाराज पुलाखालून येणा-या साधू-संतांच्या जत्थ्याचे काय करायचे? तेथील पाण्याला वेग असल्यास आणि त्यातून मार्गक्रमण करण्यास साधूंनी नकार दिल्यास? किंवा तेथून पुढे पाठविणे धाेक्याचे असल्यास काय? त्याचा विचार तसेच प्रथमच वापरल्या जाणा-या नवीन शाहीमार्गाच्या पर्यायाचा विचार आताच केल्यास ती शाहीस्नानाच्या मार्गातील धाेक्याची घंटा ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गत वर्षभरापासून पावसाचा काेणताच अंदाज बांधणे कुणालाच शक्य झालेले नाही. गतवर्षीच्या जूनपासून मार्चपर्यंत सातत्याने दहा महिने थाेड्याफार प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज बांधणे आणि त्यावर धरणाचे पाणी कधी साेडायचे त्याचे नियाेजन आखणे अत्यंत बिकट ठरणार आहे. प्रचंड पाऊस आणि धरणाचे पाणी साेडण्याचे नियाेजन फसल्याचे उदाहरणदेखील नाशिककरांना ज्ञात आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा कुंभमेळा पार पाडणे हे प्रशासनासाठी ख-या अर्थाने एक दिव्य ठरणार आहे.
..असा आहे नवीन शाहीमार्ग
नाशिकच्यासिंहस्थ पर्वणीस साधूंचा जत्था तपाेवनातील बडा लक्ष्मीनारायण मंदिर येथून निघेल. तेथून ताे तपाेवन काॅर्नरमार्गे महामार्ग आेलांडून पंचमुखी हनुमान मंदिरमार्गे काट्या मारुती चाैकात येईल. गणेशवाडीतून आयुर्वेदिक महाविद्यालयासमाेरून गाडगे महाराज पुलाच्या खाली जाऊन तेथून सरळ रामकुंडाकडे जाऊन रामकुंडात स्नान करणार आहेत. या नवीन शाहीमार्गाला नाशिकमधील तिन्ही वैष्णव आखाड्याच्या महंतांनी मान्यता दिली असली तरी, त्यामुळे एेनवेळी उद‌्भवू शकणा-या समस्येची दाहकता कमी हाेणार नाही.
पुढे वाचा...