आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लाॅटचा लहान अाकार, हीच अाहे मुख्य समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वंभरदास महाराज कुंभमेळा व्यवस्थापक, दिगंबर अाखाडा - Divya Marathi
विश्वंभरदास महाराज कुंभमेळा व्यवस्थापक, दिगंबर अाखाडा
गतवेळच्या कुंभमेळ्यात नाशिकला चांगली व्यवस्था झाल्याचे संत, महंतांच्या लक्षात असल्याने ते यंदा माेठ्या प्रमाणात नाशकात दाखल हाेत अाहेत. गतवेळी कमी संख्येने खालसे असल्याने त्यांना जागादेखील पुरेशी मिळाली हाेती. मात्र, यंदाच्या वर्षी प्रशासनाकडून प्लाॅटचे अाकारमान कमी ठेवण्यात अाले अाहे. परंतु, प्लाॅट लहान असल्याने तीच सगळ्यात माेठी डाेकेदुखी ठरत असून, त्यामुळेच प्लाॅटची समस्या अद्याप तरी कायम अाहे.

{कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने केलेली व्यवस्था पुरेशी अाहे, असे वाटते का?
प्रशासनाने व्यवस्था तर चांगली करण्याचा प्रयास केला अाहे. मात्र, या कुंभात जागा जरी वाढवली असली तरी अाखाड्यांची संख्यादेखील वाढलेली अाहे. त्या प्रमाणात अाणि खालशांना जितके माेठे प्लाॅट हवे, तेवढे माेठे प्लाॅट केलेले नाहीत. ६० बाय ४० चे प्लाॅट खालशांना पुरेसे वाटत नसल्यानेच जागावाटपाच्या समस्येत भर पडली अाहे.

प्लाॅटचे अाकारमान कमी असल्याचे तुमच्या कुणाच्याच अाधी लक्षात अाले नाही का?
अाखाड्याला किती माेठे प्लाॅट हवे, खालशांना किती माेठे प्लाॅट हवे, त्याबाबतच्या अाकारमानाची माहिती अाम्ही पूर्वीच दिलेली हाेती. त्यामुळे प्रशासन त्याच प्रकारे काम करेल, अशी अाम्हाला अाशा हाेती. त्यातदेखील जिल्हा प्रशासन अाणि मनपा प्रशासन असे दाेन भाग असल्याने त्यांच्यातही ताळमेळ नसल्याचा फटका प्लाॅटच्या अाकार निश्चितीत बसला अाहे.

{स्थानिक अाखाड्यांमध्ये पुरेशी कामे झाली का?
स्थानिक अाखाड्यांमध्ये प्रशासनाकडून कामांना प्रारंभ करण्यात अाला अाहे. मात्र, काही कामे अद्याप अर्धवट अवस्थेत अाहेत. अामच्या अाखाड्यातही काेबा काँक्रिटीकरणाचे काम अद्याप अर्धवट अाहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक स्थानिक अाखाड्यात, अाश्रमांमध्ये हीच स्थिती अाहे. अजून तिन्ही अनी अाखाड्यांच्या जागेला कुंपण पडलेले नाही. ही सर्व कामे लवकरात लवकर अाणि वेळेत पूर्ण हाेणे अावश्यक अाहे. त्यामुळे प्रशासनाने अाता तरी प्लाॅट वाटपासह सर्व कामांना वेग द्यायला हवा.

कामे वेळेत पूर्ण हाेतील, असे तुम्हाला वाटते का?
अाखाड्यांचे ध्वजाराेहण १९ अाॅगस्टला अाहे. त्यापूर्वी साधारणपणे एक अाठवडा सर्व खालसे व साधू डेरेदाखल हाेतील. ताेपर्यंत अजून एक महिन्याचा काळ बाकी अाहे. त्यामुळे ताेपर्यंत कामे पूर्ण हाेऊ शकतील. पण, त्याअाधीच ती व्हायला हवीत, असे वाटते.

बातम्या आणखी आहेत...