आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात वैविध्यपूर्ण प्रशस्त मंडप उभारणीतून कोट्यवधींची उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पावसाळ्यातील कुंभमेळ्याचा अनुभव गाठीशी असलेल्या अाखाडे-खालशांकडून यावेळी खास वाॅटरप्रूफ टेंट उभारण्याला प्राधान्य दिले अाहे. अाखाड्यांच्या व्यवस्थेनुसार अल्युमिनिअमचे डाेम, शामियाना लावण्याबराेबर पत्र्यांचेही शेड अाकारास येऊ लागले अाहेत. त्यातून यावेळी मिलिटरी, जर्मन पॅगाेडा टेंट, छाेेलदारी, डोम, टीन शेड असे वैविध्यपूर्ण मंडप पाहायला मिळतील.
१९ अाॅगस्टच्या अाखाड्यातील ध्वजाराेहणापासून १८ सप्टेंबरच्या तिसऱ्या शाही पर्वणीपर्यंत सुमारे तीन ते चार लाख साधू-महंतांचा तपाेवनातील साधुग्राममध्ये मुक्काम राहणार अाहे. तब्बल ३२५ एकरवर वसलेल्या या साधुग्राममध्ये अस्थायी स्वरूपातील भक्कम निवासाची व्यवस्था अाकारास येत अाहे. त्यासाठी शेकडाे मजूर अहाेरात्र मेहनत घेत अाहेत. साधारणत: एक हजारांहून अधिक लहान-मोठ्या मंडपांवर सुमारे १० कोटींहून अधिकची उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
प्रशासनाने साधुग्राममधील प्रत्येक प्लॉटमध्ये वीज, पाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. त्यानुसार, अाता अाखाडे खालशांनी मंडप उभारणी कामाला वेग दिला अाहे. सिंहस्थातील तिन्ही पर्वण्यांसाठी तब्बल तीन ते चार लाख साधू-महंत येण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, गुरुपाैर्णिमेनंतर साधुग्राममध्ये साधू-महंतांची मांदियाळी दृष्टीस पडू लागली अाहे. राहण्यासाठी तसेच अन्नछत्रासाठी मंडप उभारण्याचे काम व्यावसायिकांना देण्यात अाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यात मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात या ठिकाणांहून व्यावसायिक साधनसामग्रीसह दाखल झाले आहेत.
कुंभ तेथे व्यवसाय : खासकुंभमेळ्यात मंडप उभारणीचा अनेकांचा वडिलाेपार्जित व्यवसाय अाहे. त्यातील काहींनी साधुग्राममधील कामे घेतली असून, सिंहस्थ पर्वण्या संपल्यानंतर सर्व साहित्यानिशी ते उज्जैनला जाणार अाहेत.
अाठवडाभरात काम पूर्णत्वास
साधू-महंतांकडूनवेगवेगळ्या प्रकारचे प्रशस्त असे मंडप उभारण्याची मागणी वाढली आहे. मंडपांसाठी खास मध्य प्रदेशातूनच सर्व अावश्यक साहित्य आणले अाहे. इतर वस्तू स्थानिक बाजारपेठेतून घेत अाहाेत. प्रशिक्षित कारागीर असल्याने काम निर्धारित वेळेत पूर्ण हाेईल. येत्या आठवडाभरात बहुतांश कामे पूर्णत्वास गेलेली असतील. -अमित पुरवार, व्यावसायिक
प्रमुख महंतांसाठी अारामदायक राहुट्या
आखाडे खालशांच्या प्रमुख महंतांच्या निवासासाठी खास आलिशान अन् आकर्षक मंडप उभारले जात अाहेत. या मंडपांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते वॉटरप्रूफ अन‌् वातानुकूलित असतील. तसेच, डोम पत्र्यांच्या मंडपातही फॅन दिवाबत्तीची व्यवस्था राहणार आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मंडपाचे विविध प्रकार..