आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपाध्यक्षांसह मंत्र्यांसाठी साधुग्राममध्ये खास शामियाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधू-महंतांच्यासमस्या एकीकडे, तर दुसरीकडे भाजपाध्यक्ष अाणि इतर मंत्री येण्याची, त्यांच्या विश्रामाची खास तयारी सुरू झाली अाहे. त्यासाठी निर्माेही अाखाड्याशेजारच्या जागेवर तत्काळ व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची चर्चा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महंतांशी कुजबुजत केली.
साधुग्राममध्ये अाता साधू-महंत येण्यास सुरुवात झाली अाहे. १९ अाॅगस्टला नाशिकमधील अाखाड्यांचे ध्वजाराेहण हाेणार अाहे. दरम्यान, दिगंबर, निर्वाणी अाणि निर्माेही अाखाड्याचे ध्वजाराेहण सकाळी वाजून १० मिनिटांनी हाेणार असून, या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार अाहेत. या मंत्र्यांसह कुंभपर्वात राज्यातील केंद्रातील अनेक मंत्री हजेरी लावणार अाहेत. यांना क्षणभर विश्रांतीसाठी निर्माेही अाखाड्याच्या शेजारी अहमदाबादच्या श्री जगन्नाथजी मंदिराच्या महंतांनी अापला डेरा वसवला अाहे. या जागेवर हा शामियाना उभारण्यात येणार असल्याची चर्चा महंतांशी महाजन यांनी केली. इतर तीन मुख्य अाखाड्यांना जसे अालिशान टेंट उभारण्यात अाले अाहेत, तसाच टेंट या जागेवरही उभारण्यात यावा, अशी मागणी श्री जगन्नाथजी मंदिराच्या महंतांनी करताच महाजन यांनी तत्काळ ठेकेदाराला सूचना केल्या. अर्थात येथे तसे टेंट लागले तर त्या ठिकाणी अालिशान अासन व्यवस्था, डायनिंग, एसी असा राजेशाही थाट असेल हे वेगळे सांगायला नकाेच.
म्हणून या जागेवर केली व्यवस्था
मुख्य म्हणजे ही जागा तिन्ही अाखाड्यांना लागूनच अाहे. त्यामुळे येणाऱ्या मंत्र्यांना तत्काळ तिन्ही अाखाड्यांना भेटी देणे साेयीचे हाेईल. दुसरे म्हणजे अहमदाबाद येथील श्री जगन्नाथजी मंदिर प्रसिद्ध अाहेच. भाजपाध्यक्ष हे जगन्नाथाचे भक्त अाहेत, त्यामुळे अामच्या जागेवरील टेंटमध्ये त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू अाहे. -महेंद्रभाई झा, प्रमुख, श्री जगन्नाथजी मंदिर, अहमदाबाद