आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राममधील जागांप्रश्नी प्रशासनाच्या अडचणींत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर साधू-महंत नाशकात दाखल होत असून, त्यांच्याकडून निवासासाठी साधुग्राममधील जागा मागणीच्या प्रशासनाकडील प्रस्तावांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र, जागांचे वाटप आखाड्यांच्या वतीने झाल्याने ऐनवेळी विविध संस्था साधूंकडून जागेची मागणी होत असल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
तपोवनात ३२५ एकर जागेत साधुग्राम उभारले असून, काही धार्मिक आणि स्वयंसेवी संस्थांच्याही जागा सिंहस्थासाठी उपयोगात आणल्या जात आहेत. साधुग्राममधील जागा वाटपही झाले आहे. मात्र, आता काही साधू-महंत दाखल होत असून, त्यांनीही जागा मिळण्यासाठी कुंभमेळा कक्षाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

..अन्यथा परत जाणार :
नेपाळमधूनअालेल्या माधव आचार्य यांनी भूकंप हे विलंबाचे कारण दिले असून, गेल्या सिंहस्थात जागा मिळाल्याचे सांगत यंदाही राहण्यासाठी जागेची अपेक्षा केली आहे. अन्यथा परत जाण्याचे संकेतही दिले आहेत.