आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बल्ली बॅरिकेडिंगमुळे हाेतोय स्थानिकांना 'तुरुंगवास'...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे मुंबई नाक्यापासून द्वारका पुढे औरंगाबाद नाक्यापर्यंत बल्ल्यांच्या साहाय्याने बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचे नियोजन करता लावण्यात आलेल्या या बॅरिकेडिंगमुळे स्थानिक नागरिकांनाच 'तुरुंगवास' झाल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे प्रशासनातर्फे तपोवन परिसरातील बल्ली बॅरिकेडिंग काढण्यात आले. मात्र, हे बॅरिकेडिंग लावण्यावर काढण्यावरच हजारो रुपये खर्च केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. िवशेष म्हणजे, पालकमंत्र्यांनी अादेश देऊनही येथील बॅरिकेडिंग काढण्यात अाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला अाहे.
साधुग्राममध्ये भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी औरंगाबादरोडसह तपोवनाकडे जाणारे काही मुख्य आणि अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई नाका परिसरापासून ते आैरंगाबाद नाक्यापर्यंत बल्ली बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. २९ ऑगस्टला होणाऱ्या सिंहस्थ महापर्वणीसाठी पोलिस प्रशासनाने तीन आठवडेआधीच हे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूने शाळा, रुग्णालय क्लासेस असल्यामुळे या भागात दररोज शेकडाे विद्यार्थी पालक ये-जा करतात. बल्ली बॅरिकेडिंगमुळे त्या सर्वांनाच मोठा फेरा पडत आहे. बॅरिकेडिंगवरून पडून काही विद्यार्थी जखमीदेखील झाले अाहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्यावर प्रशासनातर्फे ठराविक भागातील बल्ली बॅरिकेडिंग काढण्यात आले. तसेच तिग्रानिया भागात विद्यार्थ्यांसाठी जागा सोडण्यात आली आहे. मात्र, हे बॅरिकेडिंग लावण्यावर काढण्यावरच प्रशासनाकडून हजारो रुपये खर्च केले जात असल्याने नागरिकांंत
उलटसुलट चर्चा होत आहे.
स्थानिकांना त्रास का?
सिंहस्थ पर्वणी २९ ऑगस्टला होणार आहे. बल्ली बॅरिकेडिंग २५ तारखेलाही केले असते तरी चालले असते. मात्र, तीन आठवडेअाधीच बल्ली बॅरिकेडिंग करून स्थानिक नागरिकांना त्रास का दिला जात आहे, ते समजत नाही. रियाज बाबू, स्थानिक शासनाचे आर्थिक नुकसान मुंबईनाक्यापासून द्वारका पुढे औरंगाबाद नाक्यापर्यंत बल्ली बॅरिकेडिंगवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे बॅरिकेडिंग लावण्यासाठी ठेकेदारांना दिवसाप्रमाणे पैसे दिले जात आहेत. मात्र, बॅरिकेडिंग लावण्याचे काढण्याचे अधिक पैसे घेतले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापर्वणीसाठी एक महिना अगोदरच बल्ली बॅरिकेडिंग केल्याने शासनाचे मोठे नुकसान होत आहे. पालकमंत्र्यांनी धारेवर धरूनदेखील प्रशासनाचे दुर्लक्षच बल्ली बॅरिकेडिंगवर लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. शाहीपर्वणीच्या महिनाभर अगोदरच बल्ली बॅरिकेडिंग केल्याने शासनाचे मोठे अार्थिक नुकसान होत असून, स्थानिक रहिवाशांचीही माेठ्या प्रमाणावर गैरसाेय हाेत अाहे. या प्रकरणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाेलिस अायुक्तांना धारेवर धरत अादेश देऊनही प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.