आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकला शंकराचार्यांची पेशवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर - ‘ओमनमाे शिवाय’चा जयघोष, स्वामी शंकराचार्यांचा जयजयकार ढाेल-ताशांचा गजर, सहभागी झालेले वारकरी, घाेड्यांवर स्वार झालेले नागा साधू... अशा धार्मिक वातावरणात येथे गुरुवारी द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची पेशवाई पार पडली.

द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची सजविलेल्या रथातून दुपारी वाजता गौतमी तलावाजवळून पेशवाई काढण्यात आली. यावेळी त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त यादवराव तुंगार, अॅड. श्रीकांत गायधनी, ललिता शिंदे यांनी शंकराचार्यांचे स्वागत केले. त्यांचे औक्षणही करण्यात आले. मिरवणुकीत पाच बँड पथकांसह युवक-युवती सहभागी झाल्याने पेशवाईची शोभा वाढली. नागासंन्यासी आखाड्यांचे ध्वज यांसह वेदविद्यांचे शिकण घेणारे युवकही मिरवणुकीत सहभागी झाले होते. गौतमी तलावाला प्रदक्षिणा पूर्ण करून मिरवणूक रिंगरोडमार्गे साधुग्रामकडे रवाना झाली.