आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशावर्तावर शनिवारीही भाविकांची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर - तिसऱ्या पर्वणीला लाखाे भाविकांनी वर्णी लावली, त्यातून अंतर्गत नियाेजन काेलमडून प्रशासनाने थेट प्रवासी वाहतूक व्यवस्था राेखली. परिणामी लाखाे भाविकांना नाइलाजास्तव त्र्यंबकनगरीत मुक्काम करावा लागला. दरम्यान, मध्यरात्रीनंतर वाहतूक सुरळीत हाेऊन माेठ्या संख्येने भाविक दाखल झाले. त्यांनी शनिवारी पहाटेपासूनच कुशावर्तावर पर्वणीस्नानासाठी मांदियाळी हाेती.
प्रशासकीय अंदाजापेक्षा अधिक भाविकांनी सिंहस्थ पर्वातील अखेरच्या शाहीस्नानासाठी त्र्यंबकनगरी गाठली. त्यामुळे नियाेजन काेलमडून भाविकांची गैरसाेय झाली. महिला, मुले ज्येष्ठांंची परवड झाली. दुपारनंतर शहरात येणारी वाहतूक बंद झाली. भाविक पायीच प्रवास करू लागले. त्यातून वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेऊन दुहेरी वाहतूक व्यवस्था काेलमडली. स्नान दर्शनानंतर परतीच्या प्रवासाचेही मार्ग बंद झाल्याने गल्लाेगल्ली गर्दी दिसून अाली. गैरव्यवस्थेमुळे मुक्काम झालेेल्या भाविकांनी धर्मशाळा, हाॅटेल, लाॅजिंगचा अाधार घेतला. अनेकांनी स्थानिकांच्या घरात ‘पेड’ मुक्काम केला. मात्र, तरीही हजाराे भाविकांना निवारा मिळाल्याने त्यांनी खुल्या जागा, गल्ल्यांमध्येच विश्रांती घेतली.

पोलिस बंदाेबस्त शिथिल झाल्याने मुक्त संचार
पाेलिस प्रशासनाने बंदाेबस्त शिथिल करून ठिकठिकाणचे बॅरिकेडिंग काढले. परिणामी भाविकांना सहज प्रवेश मिळाला. कुंड त्र्यंबकेश्वर मंदिरासमाेर रांगा हाेत्या. शहरातील बसस्थानक, रस्ते, सर्व हाॅटेल्स, रस्ते, मंदिर, चौक गर्दीने फुलले हाेते.

शनिवारी पहाटेपासूनच कुशावर्ततीर्थावर भाविकांनी स्नानासाठी केलेली गर्दी. प्रशासकीय अंदाजापेक्षा अधिक भाविक शाहीस्नानासाठी त्र्यंबकमध्ये दाखल झाले.

प्रथमच एवढी गर्दी
^त्र्यंबकेश्वरअन‌् पर्यायाने कुशावर्तावर प्रथमच इतकी गर्दी झाली हाेती. यापूर्वी कधीही अशी गर्दी अनुभवली नव्हती. - कीर्ती वाघ, सुरक्षा रक्षक,कुशावर्त

प्रचंड गर्दी वाढल्यामुळे व्यवसाय तेजीत
^यापूर्वीचा कुंभमेळा तसेच प्रथम दाेन्ही पर्वण्यांच्या तुलनेत तिसऱ्या पर्वणीला ‘न भूताे भविष्यति’ अशीच गर्दी उसळली हाेती. प्रारंभी व्यावसायिकांचा झालेला अपेक्षाभंग या पर्वणीत हाॅटेल व्यवसाय तेजीत अाल्याने दूर झाला.- हेमंत माळी, हाॅटेल चालक