आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभपर्व: नवरत्नांबाबत मतभिन्नता, मात्र अाेढ कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरत्नांबाबत जितकी मतभिन्नता अाहे, त्यांच्या परिणामकारकतेबाबत जितके वादविवाद आहेत, तितकेच वाद फारच थाेड्या भाैतिक वस्तूंबाबतीत अाढळतात. अर्थात, असे असले तरी शतकानुशतके नवरत्नांबाबतची अाेढ सर्वकालीन समाजात कायम अाहे. या रत्नांचे शास्त्राेक्त मूल्यांकन करणे कुणालाही शक्य नसते. त्यामुळे बहुतांश वेळा हा केवळ विश्वासाचा व्यवहार असताे. तरीही विश्वासाच्या बळावर या नवरत्नांना अाजही देशाच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी असते.
नवरत्नांपैकी चारप्रमुख रत्नांचा समावेश साेमवारच्या कुंभपर्वात करण्यात अाला हाेता. उर्वरित पाच प्रमुख रत्नांमध्ये हिरा, पाचू, पुष्कराज, गाेमेद अाणि लसण्याचा अंतर्भाव अाहे. हे प्रत्येक रत्न हाताच्या अंगठीत घालण्याची पद्धत शतकानुशतके रूढ अाहे. मात्र, पूर्वीच्या काळी काही राजे - महाराजे या नवरत्नांची माळदेखील गळ्यात घालत असल्याचे दाखले अाढळतात.
पुढे जाणून घ्‍या... पाचू, हिरा, पुष्कराज , लसण्या आणि गाेमेद रत्नांविषयी