आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभपर्व: भगवान शिवशंकराला सर्वाधिक प्रिय असताे जलाभिषेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान शिवशंकराला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या साधनेत जलाभिषेकाला अग्रस्थान असते. पंचतत्त्वांमधील अत्यंत महत्त्वाचे तत्त्व म्हणून जलतत्त्वाला मान्यता असून, त्याच जलाच्या नित्य अभिषेकाने शिवशंकर प्रसन्न हाेत असल्याने बहुतांश शैवपंथीय साधक कुंभपर्वणीदरम्यान शंकराच्या पिंडीवर अखंड जलधारा ठेवण्याचा संकल्प करतात. त्यासाठी काही साधक एकधारेपासून सहस्त्रधारा पात्रांतूनही जलाभिषेक करतात.

अशा या महादेवाचा वास हा बहुतांश मुख्य जलस्राेतांच्या अासपास अाढळण्यामागे त्याला जलतत्त्व किती प्रिय अाहे तेच अधाेरेखित हाेते. तसेच भगवान विष्णूचाही जलतत्त्वात वास असल्याने जलाभिषेकातून शंकर अाणि विष्णूचा समन्वय राखला जात असल्याचीही भाविकांची साधना असते.

वाचा, केवळ शंकरालाच महादेव संबाेधन...