आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभपर्व: पाइपलाइनने थेट पाणी उचलल्यास मिटेल समस्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक मधील विद्यमान आठ आणि गंगापूर तसेच पिंपळगाव खांबला हाेणा-या प्रत्येकी एक याप्रमाणे दहा एसटीपीमधून निघणारे शुद्धीकृत मलजल थेट पाइपलाइनने इंडिया बुल्सच्या सेझसाठी उचलण्याचा निर्णय झाला. मात्र, इंडिया बुल्सचा प्रकल्प जेव्हा कार्यान्वित हाेईल, तेव्हाच ते पाणी उचलले जाणार असल्याने ताेपर्यंत तथाकथित शुद्धीकरण झालेले मलजल थेट नदीपात्रात साेडलेच जाणार आहे. संबंधित कंपनीकडून किमान यंदाच्या सिंहस्थापूर्वी तरी ही पाइपलाइन टाकली जाण्याची शक्यता नसल्याने मनपा प्रशासनाने एेन पर्वणीदरम्यान भरपूर पाऊस पडेल आणि सारे पाणी ‘निर्मळ’ हाेऊन जाईल, असे देवाच्या भरवशावरच नियाेजन केले आहे.

एकलहरा ऊर्जा प्रकल्पालादेखील एसटीपीचे पाणी वर्ज्य
नॅशनलएन्व्हाॅयर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात ‘निरी’ या संशाेधक संस्थेने एसटीपीमधून निघणारे पाणी नदीपात्रात साेडता प्रामुख्याने शेतीला किंवा आैद्याेगिक कारणासाठी वापरण्याचा पर्याय सुचविला हाेता. त्यात शेतीला पाणी वेगवेगळ्या पाइपलाइनने साेडणे अशक्य असले, तरी एकलहरा प्रकल्पासह इंडिया बुल्सच्या प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाला लागणारे शेकडाे दशलक्ष लिटर पाणी थेट या एसटीपींच्या आउटलेटमधून उचलणे शक्य आहे. एकलहरा विद्युत प्रकल्पाला (एनटीपीसी) दरराेज प्रकल्पाच्या कुलिंगसह अन्य आैद्याेगिक वापरासाठी माेठ्या प्रमाणात पाणी लागते. ते पाणी कंपनी आेढ्यानजीक गाेदापात्राच्या बॅरेजमधून उचलते. मात्र, त्या पाण्यातील टाेटल सस्पेन्डेड साॅलिडचे (टीएसएस) प्रमाण इतके अधिक असते की, कुलिंगसह अन्य काेणत्याही वापरासाठी ते पाणी जसेच्या तसे वापरता येत नाही. त्यामुळे एकलहरा प्रकल्पात पाणी शुद्धीकरणाचे स्वतंत्र युनिट असून, त्यात हे गाेदापात्रातून उचललेले पाणी शुद्ध करून मगच वापरले जाते.
पुढे वाचा...