आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रथांच्या संख्येत होणार घट, दुसऱ्यापर्वणीसाठी तिन्ही अनी आखाड्यांची तयारी पूर्णत्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणीचा अभ्यास करीत आखाडे खालशांनी अंतर्गत नियोजनात बदल करीत पाेलिस जिल्हा प्रशासनालाही काही महत्त्वपूर्ण बदल सुचविले आहेत. पहिल्या शाही मिरवणुकीत रथांची संख्या अधिक असल्याने मिरवणुकीला विलंब झाला होता. दुसरी शाही मिरवणूक वेळेत होण्यासाठी रथांची संख्या कमी करतानाच एका रथावर दाेन महंत विराजमान होणार असल्याचे प्राथमिक नियोजन आहे.

दि. १३ सप्टेंबर राेजी येणारी दुसरी शाही पर्वणी भाविकांना विनाअडथळा साधता यावी, यासाठी तिन्ही अनी आखाड्यांचे साधू-महंत आग्रही असून, त्या दिशेने नियोजन आखले जात आहे. परंपरेनुसार निर्मोही आखाड्याच्या अग्रक्रमाने शाही मिरवणुकीला प्रारंभ होणार असून, त्यानंतर दिगंबर आणि शेवटी निर्वाणी आखाड्याची मिरवणूक असेल. मिरवणुकीत मर्यादित रथांचा समावेश करून वेळेत शाहीस्नानाला प्राधान्य दिले जाईल. मात्र, त्यानंतर भाविकांनादेखील रामकुंडावर स्नानाची पर्वणी साधू द्या, अशी सूचना प्रमुख महंतांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी बंदाेबस्त आवश्यक आहेच. मात्र, त्यातून भाविकांची अडवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

मिरवणुकीत १५० रथ कमी करण्याचे प्रयत्न
दिगंबरअनी आखाड्याचे सर्वाधिक जवळपास ४५० खालसे आहेत. पहिल्या पर्वणीला या आखाड्याची मिरवणूक निर्धारित वेळेत रामकुंडावर पाेहोचली नाही. मात्र, त्यापाठाेपाठ येणाऱ्या निर्माेही आखाड्याने आपल्या वेळेतच निघण्याचा आग्रह धरल्याने काही काळ गाेंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सदरची परिस्थिती टाळण्यासाठी यावेळी १५० रथ कमी करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. एका रथावर एकपेक्षा अधिक महंत बसविण्यासंदर्भात शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

मिरवणूक प्रारंभ स्नानाची वेळ
निर्मोही ६.०० वाजता ७.३० वाजता
दिगंबर ६.३० वाजता ८.०० वाजता
निर्वाणी ७.०० वाजता ८.३० वाजता

दुसऱ्या पर्वणीत निर्माेही आखाड्याला मान
आखाड्यांनी शाहीस्नानाचा क्रम निश्चित केलेला आहे. त्यानुसार पहिल्या पर्वणीला निर्वाणी आखाड्याने प्रथम स्नान केले. आता दुसऱ्या पर्वणीला हा मान निर्माेही आखाड्याला मिळणार आहे. त्यापाठाेपाठ दिगंबर आणि अखेरीस निर्वाणी आखाडा त्या अंतर्गतच्या खालशातील साधू-महंत शाहीस्नान करतील.

०३ कि.मी. अंतर शाही स्नानासाठी जाण्याचा मार्ग
२०० मीटर अंतर दोन आखाड्यांमध्ये असेल
ते लाख साधू-महंतांच्या सहभागाचा अंदाज

एका रथावर दाेन ते तीन महंत...
^तिन्ही अनी आखाड्यांचे मिळून ६५०हून अधिक खालसे आहेत. त्यात दिगंबर आखाड्यातील खालशांची संख्या सर्वाधिक असून, ४५० खालशांचे रथ मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र, अर्धा तासांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येने रथ मार्गस्थ होण्यास विलंब होत असल्याने दुसऱ्या पर्वणीत रथांची संख्या कमी करण्याचे विचाराधीन आहे. एका रथावर दोन ते तीन महंत सहभागी होतील. पहिल्या पर्वणीत दिगंबर आखाड्याच्या रथांना विलंब झाल्याने निर्मोही आणि त्यांच्यामध्ये वादही झाला होता. या पार्श्वभूमीवर तिन्ही आखाड्यांच्या वतीने कमी रथ सहभागी होतील, असे नियोजन होत आहे. -महंत राजेंद्रदासजी महाराज, निर्मोही आखाडा