आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumbhamela Planing News In Marathi, Divya Marathi

रेल्वे, पुरातत्व विभागाची सिंहस्थाबाबत उदासीनता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाची कामे त्वरित पूर्ण होण्याच्या दृष्टीने दिवसनिहाय कामाचे नियोजन करत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश खुद्द राज्याच्या सचिवांनीच दिल्यानंतरही रेल्वे व पुरात्व विभागाची उदासीनता कायम आहे. त्यामुळे त्यांच्या विभागाचे किती काम झाले आणि उर्वरित कामांसाठी कसे नियोजन करायचे, याबाबत सिंहस्थ यंत्रणाचा बुचकळ्यात पडली असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले.

दिवसनिहाय कामांच्या नियोजनामुळे कामांना वेग प्राप्त झाला आहे. त्याचाच भाग म्हणजे वीज कंपनीला आपले खांब आणि पॉवर हाउससाठी पंचवटी व तपोवनात हवी असलेली जागा देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे. वीज कंपनीला वरिष्ठ कार्यालयातून या कामाबाबत मंजुरी मिळाली असून, कामे त्वरित सुरू होणार आहेत. केवळ महापालिकेला संबंंधित जागेच्या भाड्याबाबत जो काही पेच निर्माण झाला होता ते भाडेही कमी करून देण्याचे पत्र वीज कंपनीने महापालिकेला दिले आहे, असे कुंभमेळा अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पुरातत्व विभागाकडून करण्यात येणारी मंदिरे जतनाची कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत. एक कोटी 21 लाख रुपयांच्या कामांना अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. मेळा अधिकारी महेश पाटील आणि उदय किसवे यांनी कामांची प्रगती ऑनलाइन दिसण्यासाठी तयार केलेल्या वर्क ट्रेनिंग मॉनेटरिंग सॉफ्टवेअरची, तसेच त्याच्या वापराची माहिती दिली. या वेळी महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, शहर अभियंता सुनील खुने, आर. के. पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजय हाके, आरोग्य उपसंचालक डॉ. बी.डी. पवार, सहायक पोलिस आयुक्त पंकज डहाणे आदी उपस्थित होते.

पॉवर हाउसबाबत निर्णय
महापालिका आणि वीज कंपनीमध्ये पॉवर हाउसच्या जागेसंदर्भातील निर्णय रखडला होता. त्यावर मंगळवारी सकारात्मक चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्याने या प्रश्नाचा तिढा अखेर सुटला आहे.