आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या अधिकाऱ्यांच्या हाती सिंहस्थ नियाेजनाचा ध्वज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभ मेळ्यासारख्या माेठ्या उत्सवाच्या नियाेजनासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची शहराला गरज असताना, उत्सव एेन ताेंडावर अाला असताना जिल्हाधिकारी अाणि पाेलिस अायुक्तांची बदली झाल्याने नवीन अधिकारी सिंहस्थाची कामे कधी समजून घेतील अाणि पुढील नियाेजन कधी हाेईल, असा प्रश्न उपस्थित झाला अाहे. विशेष म्हणजे, राज्य सरकार त्यात प्रामुख्याने पालकमंत्रीही या बदलीसत्राबाबत माैन बाळगून असल्याने शहराला पालकच काेणी राहिला नसल्याची लाेकभावना निर्माण झाली अाहे.

सिंहस्थ कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे दर्शन तसेच सत्संग देणारे आध्यात्मिक संमेलन म्हणून ओळखले जाते. १५ जुलैपासून या मेळ्याला नाशकात सुरुवात हाेत अाहे. गेल्या सिंहस्थात दुसऱ्या पर्वणीला सर्वाधिक गर्दी झाली हाेती. यावेळी तब्बल ५० ते ६० लाख भाविक उपस्थित हाेते, असा अंदाज माध्यमांनी व्यक्त केला हाेता. गेल्या बारा वर्षांत शहराची लाेकसंख्या माेठ्या प्रमाणात वाढली अाहे. शिवाय, भाविकांची संख्याही वाढत अाहे. त्यामुळे यंदाच्या मेळ्याला काेट्यवधी भाविक अाणि साधू-महंत उपस्थिती लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात अाहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या कुंभमेळ्यात प्रशासकीय नियाेजनाची कसाेटी लागणार अाहे. परंतु, ज्यांच्या शिरावर या राज्याची अाणि त्या अनुषंगाने शहराची जबाबदारी अाहे, त्या राज्यकर्त्यांना या मेळ्याविषयी काहीही साेयरसुतक नसल्याचे अलीकडील काही घडमाेडींवरून दिसते.

सिंहस्थाच्या ताेंडावर जिल्हाधिकारी अाणि पाेलिस अायुक्तांची करण्यात अालेली बदली या बाबीला ठळकपणे अधाेरेखित करते. वास्तविक सिंहस्थासारखा माेठा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असते. ज्यांना या शहराची जवळून अाेळख अाहे, असे अधिकारी काटेकाेर नियाेजन करू शकतात. किंबहुना, शहराची त्यांना चांगली अाेळख असल्याने निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग बहुमूल्य ठरताे. याउलट जर सर्वाेच्च पदावरील अधिकारी नव्याने शहरात दाखल झाले असतील तर त्यांना सिंहस्थासारखा गंभीर अाणि तितकाच प्रशासकीय बाबतीत िकचकट असणारा विषय समजावून घेताना काही कालावधी लागताे. हा कालावधीच मिळाला नाही तर त्यांना अापल्या अखत्यारितील अन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून राहावे लागते. म्हणजेच निर्णय प्रक्रियेत मुख्य अधिकारी बाजूला राहून अन्य अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.
अटीतटीच्या समयी जर महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास मुख्य अधिकाऱ्यांना जबाबदारीपासून हात झटकून चालतच नाही.नाशिकमध्ये मात्र सिंहस्थ दाेन महिन्यांवर येऊन ठेपला असताना तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील अाणि पाेलिस अायुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची बदली करून त्यांच्या जागी अनुक्रमे दीपेंद्रसिंह कुशवाह अाणि एस. जगन्नाथन यांची नियुक्ती करण्यात अाली. या दाेन्ही अधिकाऱ्यांना नाशिकमधील हाेऊ घातलेल्या सिंहस्थाच्या कामकाजाविषयी कवडीची माहिती नसताना ते इतक्या माेठ्या उत्सवाचे नियाेजन कसे करणार, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे.

रमणी अायाेग अहवालाला वाटाण्याच्या अक्षता
नाशिकमध्येगेल्या सिंहस्थात २७ सप्टेंबर २००३ रोजी दुसऱ्या पर्वणीच्यावेळी चेंगराचेंगरी होऊन ३३ भाविकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चाैकशीसाठी शासनाने गठित केलेल्या रमणी अायाेगाच्या अहवालात सिंहस्थाच्या सहा महिने अाधी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बदली करणे सयुक्तिक नसल्याची टिप्पणी देण्यात अाली अाहे. वैद्यकीय कारणास्तव करण्यात येणारी बदली याला अपवाद ठरविण्यात अाली हाेती. परंतु, नाशकात दाेन्ही प्रमुख पदांवरील बदल्यांमागे वैद्यकीय संदर्भातील काेणतेही कारण देण्यात अालेले नाही. त्यामुळे या दाेन्ही बदल्यांमागच्या हेतूबाबतच संशय व्यक्त हाेत अाहे.

पालकमंत्र्यांची नेमकी जबाबदारी काय?
सिंहस्थकामांच्या दर्जाविषयी शंका उपस्थित हाेत असताना कामे धिम्या गतीने सुरू असताना पालकमंत्री गिरीश महाजन मात्र कंबरेला लावलेल्या पिस्तुलाचे प्रदर्शन करीत भाषणे देत फिरत अाहेत. िजल्हाधिकारी पाेलिस अायुक्तांची बदली हाेणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास अाले असतानाही त्यांनी बाळगलेले माैन संशयास खतपाणी घालत अाहे. तसेच, त्यांनी अापल्या निकटवर्तीयांना काही िदवस अाधीच अायुक्तांच्या बदलीचे संकेत दिले हाेते.