आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाही भाविक मार्गांवर होतेय दर १५ मिनिटांनी तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या रविवारी (दि. १३) होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीमुळे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत शहरातील विविध रस्त्यांसह भाविक मार्गांवर बॉम्ब शोध (बीडीडीएस) पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. दुसऱ्या पर्वणीकरिता लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

दुसऱ्या पर्वणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त असला, तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरुवातीलाच पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याने सिंहस्थावरील दहशतवादाचे सावट कायम आहे. पर्वणीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘फोर्स वन’ची सुरक्षा तैनात राहाणार आहे. अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
शहरातील सर्वच रस्त्यांवर ‘बीडीडीएस’ पथकांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. शाहीमार्ग साधुग्राममध्येही १२ पथकांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येत आहे.

..या मार्गांवर सुरू आहे तपासणी
साधुग्राम,लक्ष्मीनारायण मंदिर, दिगंबर आखाडा, तपोवन क्रॉसिंग, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, गौरी पटांगण, सरदार चौक, रामकुंड, इंद्रकुंड, पंचवटी कारंजा, निमाणी, सेवाकुंज, संतोष टी पॉइंट, औरंगाबाद चौफुली, स्वामीनारायण पोलिस चौकी, जनार्दन स्वामी मठ, त्याचप्रमाणे दहावा मैल, आडगाव, माडसांगवी शिवार, मोहगाव, चिंचोली, राजूर बहुला, विल्होळी, मखमलाबाद, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निलगिरी बाग, सिन्नरफाटा, महामार्ग बसस्थानक, नाशिकरोड परिसर, डोंगरे वसतिगृह, के. के. वाघ या वाहनतळांसह भाविक मार्गांची तपासणी करण्यात येत आहे.

अफ‌वांवर विश्वास ठेवता सहकार्य करावेे
^अतिरिक्त बंदोबस्तामुळे भाविकांनी सुरक्षेबाबत काळजी करू नये. भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या अफ‌वांवर विश्वास ठेवता शाहीस्नानासाठी उपस्थित राहावे, तसेच पोलिस दलास सहकार्य करावे. एस.जगन्नाथन, पोलिस आयुक्त