आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कामांच्या पूर्णत्वासाठी महापालिकेला ‘अल्टीमेटम’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंहस्थकुंभमेळा १४ जुलैला होणा-या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने १२ जुलैपर्यंत महापालिकेमार्फत सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने ‘अल्टीमेटम’ दिला आहे.

रामकुंडापासून तर साधुग्राम, तपोवनपर्यंत पालिकेतर्फे कामे सुरू आहेत. ती वेळेत पूर्ण झाल्यास आवश्यक तयारी करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळेल, हा पत्रामागचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ जुलैपर्यंत येथील कामे पूर्ण झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना, साहित्य सामुग्री बंदोबस्ताचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

कर्ज फेटाळल्यामुळे विकासकामांवर बोजा
सिंहस्थाच्यापार्श्वभूमीवर आवश्यक कामांच्या भूसंपादनासाठी ५० कोटींच्या कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता या कामांसाठी महापालिकेच्या स्वनिधीतून खर्चाची तयारी प्रशासनाने चालवली आहे. स्थायी समितीने काही दिवसांपूर्वी कर्ज उभारणीच्या प्रस्तावाला लाल कंदील दाखवला होता. त्यानंतर महापालिकेने आता अत्यावश्यक भूसंपादनाचे कारण सांगून स्वनिधीतून पैशांच्या मागणीचा पवित्रा घेतला आहे. परिणामी, नगरसेवकांच्या विकास निधीला कात्री लागण्याची शक्यता आहे.