आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कुंभमेळा पार्किंगसाठी 550 हेक्टर जागा अपेक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केवळ वाहनतळांसाठीच जवळपास साडेपाचशे हेक्टर जागेची आवश्यकता लागणार आहे. या जागेच्या निश्चितीची प्रक्रिया सुरू असून, नाशिक शहरासाठी वाहनतळांच्या जागांची गुरुवारी पाहणी करण्यात आली. त्यात आवश्यक आठपैकी सात निकालांबाबत एकमत झाले.

सिंहस्थात येणा-या भाविकांच्या वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था शहराबाहेरच केली जाणार आहे. त्यात नाशिक शहरात प्रवेश करणारी वाहने विविध आठ ठिकाणी पार्क केली जातील. तर, त्र्यंबकेश्वरसाठीची वाहने चार ठिकाणी व या व्यतिरिक्त ग्रामीण भागात विविध
देवस्थानांना होणारी गर्दी लक्षात घेता अशा तीन ठिकाणी वाहने पार्किंगची व्यवस्था
करण्यात येणार आहे. पुणे रस्त्यावर 100 हेक्टर, मुंबई-आग्रा महामार्गावर दोन्ही बाजूने
200 हेक्टर इतर ठिकाणांसाठी

20 ते 40 हेक्टर आणि त्र्यंबकेश्वरच्या खंबाळे येथील पार्किंगला 200 हेक्टर जागेची असे जवळपास 550 हेक्टर जागा वाहनतळांसाठीच आवश्यक असल्याचे मेळा अधिकारी महेश पाटील व उदय किसवे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वरची तीन बाहेरील आणि एक आतील असे चार ठिकाणे निश्चित झाली आहेत. नाशिकसाठी विल्होळी, पुणे रस्त्यावर शिंदे-पळसे शिवारात मोह-चिंचोली येथे, औरंगाबाद रस्त्यावर शिलापूर, आग्रा-मुंबई हायवेवर आडगाव परिसरात, दिंडोरीसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ, पेठ रस्त्यावरील राऊ हॉटेल व गिरणारेकडून येणा-या वाहनांसाठी दुगाव परिसरात वाहनतळ केले जाईल. तेवढेच वाहनतळ शहरातही उभारण्यात येणार असून, शहराबाहेरील वाहनतळातून बसेसद्वारे शहरातील वाहनतळापर्यंत भाविकांना सोडले जाईल. तेथून त्यांना पायी जावे लागणार आहे.