आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री अाले, पण कामगार गेले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधुग्राममधील कामांच्या पाहणीचा दाैरा पालकमंत्री अाणि अामदारांनी माेठा गवगवा करत केला. पालकमंत्र्यांनी अनेक कामांच्या जागेवरच सूचनाही दिल्या. पण, अधिकारी पालकमंत्र्यांची पाठ फिरत नाही ताेच कामगारांनीही जी पाठ फिरवली ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत एकही कामगार अाखाड्यांमधील कामांसाठी फिरकलेला नसल्याने महंतांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली अाहे.
साधुग्राम मधील कामांच्या पाहणी दाैऱ्यादरम्यान पालकमंत्री गिरीश महाजन, अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी दीपेंेद्रसिंह कुशवाह, महापालिका अायुक्त प्रवीण गेडाम, पाेलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांच्यासह इतरही अधिकाऱ्यांनी मुख्य अाखाड्यांतील महंतांशी चर्चा करत साेयी सुविधांचा अाढावा घेऊन सूचना केल्या.
महंतांनी यात प्रामुख्याने जमिनीचे सपाटीकरण, शुद्ध पाण्याची व्यवस्था, पाण्याच्या ताेट्या, सांडपाण्यासाठी खाेदलेले खड्डे बुजवावे, वाहनपास द्यावे अशा मागण्यांचा पाऊसच यावेळी या लाेकप्रतिनिधी अाणि अधिकाऱ्यांवर पाडला. त्याचा माेठा गवगवाही झाला. पालकमंत्री, अामदार अाणि अधिकाऱ्यांनी ठेकेदारांसह कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात सूचनाही केल्या. पण हा ताफा साधुग्राम बाहेर जात नाही ताेच अनेक ठिकाणची कामेच बंद झाली. अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर कामं सुरू अाहेत की, नाही हे पाहण्याचे काम खरे तर त्यांचे अाहे. पण, त्यांनीही केवळ एेकण्याची भूमिका घेतली. मंगळवारी तर दिवसभर कर्मचारीच फिरकले नसल्याने जी कामे हाेत हाेती तीदेखील तशीच पडून असल्याने दाेन िदवस वाट बघू अन्यथा अनेक पर्याय अाहेत, अशी भूमिका साधूंनी घेतली अाहे.
फक्त दिसतात झाडणारे...
साधुग्राममध्येकुठेही फिरा अगदी जिथे फक्त पत्रे ठाेकलेले अाहेत अशा एखाद्या काेपऱ्यात चक्कर मारावी तिथे तुम्हाला साधू कमी अाणि ‘स्वच्छता कर्मचारी’ असे लिहिलेले केशरी रंगाचे जॅकेट घातलेले कर्मचारी दिसतील. ते तिथे खडी, डबरवर झाडू फिरवताना दिसतील. अापण जर जवळ जाऊन बघितले तर तिथे काहीही कचरा नसताे. तरीही हे सगळे लाेक एकाच ठिकाणी झाडझूड करत असतात. मुख्य रस्ते तर दिवसभर हे लाेक स्वच्छ करत असतात. कचरा काहीही नसताे. एखादा ठेकेदार अाला वा त्या-त्या गटाचा मुकादम अाला तर यांची धावपळ बघण्यासारखी असते. लगेच झाडू उचलतात अाणि स्वच्छ जागेवरच कामाचा देखावा सुरू झालेला असताे. हेच जर काम अाखाड्यांमध्ये वा खालशांमध्ये केले तर घाणीचा प्रश्नच येणार नाही, अशी चर्चा साधूंमध्येच सुरू अाहे.
सिर्फ बाेलते है, करते कुछ नहीं।
हे सगळे लाेक फक्त येऊन गेले, अनेक अाश्वासनेही त्यांनी अाम्हाला दिली. ठेकेदार, कर्मचाऱ्यांना सूचनाही दिल्या. पण ते जसे गेले त्यानंतर कर्मचारीही गायब झाले अाहेत. अाजतर एकही जण इकडे फिरकलेला नाही. अजून दाेन दिवस अाम्ही वाट बघू त्यानंतर अाम्ही अामच्या पद्धतीने ही कामे करून घेऊ. पण, या लाेकांनी देखावा करू नये. ये लाेग सिर्फ बाेलते है, करते कुछ नही। -महंत वैष्णवदासजी महाराज, दिगंबर अाखाडा