आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावनईत आज सिंहस्थ ध्वजारोहण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - श्री क्षेत्र कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्री गुरुवारी (दि. १६) दुपारी ११ वाजता सिंहस्थ पर्वाचे ध्वजारोहण सोहळा साधू-संतांच्या व भक्तगणांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष कुलदीप चाैधरी यांनी दिली.

ध्वजाराेहण अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज यांच्या हस्ते, तर नाणीज पीठाचे शंकराचार्य जगद‌्गुरु नरेंद्र महाराज यांच्या हस्ते जलपूजन हाेणार आहे. या साेहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस व महसूल यंत्रणेचे अधिकारी दोन-तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. तर, जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअधीक्षक सी. आर. देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह सहायक पोलिस अधिकारी, ५० पोलिस कर्मचारी व २० राखीव कर्मचारी अशी पोलिस यंत्रणा असा बंदाेबस्त राहणार अाहे. या ध्वजाराेहण सोहळ्यास वाहनांची गर्दी लक्षात घेता, तीर्थस्थळावर नियोजित वाहनतळावर व कावनई गावाजवळ वाहनतळ उभारण्यात आले आहे. दरम्यान, सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने इगतपुरी-ओढा ही नवीन स्पेशल रेल्वे सुरू केली असल्याने भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...