आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumbhmela Office At Nashik, 16 Post Granted News In Marathi

नाशकात कुंभमेळ्यासाठी एप्रिलपासून स्वतंत्र कक्ष; सोळा पदांना मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिंहस्थ कुंभमेळा 2015-16 च्या आयोजन व अंमलबजावणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एप्रिलमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी कुंभमेळा अधिकार्‍यासह सोळा पदांना मंजुरी देण्यात आली आहे. ही पदे 1 एप्रिल 2014 पासून अस्थायी स्वरूपात 31 डिसेंबर 2016 पर्यंत अस्तित्वात राहणार आहेत. कुंभमेळ्याचे नियोजन, सर्वकष विकास आराखडा तयार करण्यासह इतर महत्त्वपूर्ण कामकाजासाठी उच्चस्तरीय समितीने अस्थायीपदांचा सादर केलेला प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.पदांसाठी लागणारा खर्च वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे.कुंभमेळा कक्ष तातडीने स्थापनेची मागणी शासनाकडे करण्यात आली होती त्यानुसार 1 एप्रिल रोजी कक्षाची स्थापना होऊन कार्यरत होणार आहे.

मंजूर पदे
अपर जिल्हाधिकारी (कुंभमेळा) 1, उपजिल्हाधिकारी 2, नायब तहसीलदार 1, अपर पोलीस अधीक्षक 1, संशोध्न सहायक (अर्थ व सांख्यिकी) 2, कार्यकारी अभियंता 1, उपअभियंता 2, संगणक तज्ज्ञ 1, लिपिक 2, शिपाई 3.