आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumbhmela Slam Area Encroachment Out From Nashik City

अतिक्रमण - नाशिकमधील कुंभमेळा झोपडपट्टीसह आठ घरे जमीन दोस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंचवटीतील तपोवन परिसरातील कुंभमेळा झोपडपट्टीसह साधुग्रामच्या जागेतील आठ पक्की घरे मंगळवारी (दि. १८) अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत जमीनदोस्त करण्यात आली.
जेसीबीच्या साह्याने ही अतिक्रमणे पाडण्यात आली. या वेळी अतिक्रमण निर्मूलन पथकावर एक तरुणाने दगडफेक केली. तर, एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दोन अपवाद वगळता ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

तपोवन परिसरात सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून असलेले झोपडपट्टीचे हे अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाला अखेर मंगळवारी मुहूर्त लाभला. सकाळी वाजता अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक मोठ्या पोलिस बंदोबस्तात जलारामबाबा मठ परिसरात दाखल झाले. कुंभमेळा झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुमारे ७० झोपड्या जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्या. पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता तत्काळ तेथे काम सुरू करण्यात आले. दुपारी वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती.

तपोवन परिसरात पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक दाखल झाल्यानंतर तेथील आठ पक्क्या घरांवर जेसीबी फिरवण्यास सुरुवात होताच एका तरुणाने जेसीबीवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे गोंधळ उडाला. पाेलिसांनी तत्काळ दगडफेक करणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले. तर, एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी शिताफीने या महिलेस ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
परिसरातील पेरूच्या बागेमध्ये असलेली पक्की घरे या माेहिमेत पाडण्यात आली. रहिवाशांनी पथकास काही काळ मज्जाव केला. मात्र, पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात असल्याने नागरिकांनी अतिक्रमण असलेल्या ठिकाणांवरून काढता पाय घेतला. दुपारी वाजेपर्यंत ही मोहीम फत्ते झाली. या मोहिमेत सहायक आयुक्त वाडेकर, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे बहिरम, विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, संबंधित विभागाचे अभियंता ६० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
तत्काळ कामे सुरू
^अतिक्रमितजागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याकरिता तत्काळ काम सुरू केले. पुन्हा अतिक्रमण होणार नाही याकरिता दक्षता घेण्यात येत आहे. ए.पी. वाघ, विभागीयअधिकारी, पंचवटी
रहिवाशांचा विरोध
अतिक्रमण काढण्याबाबत महापालिकेने नोटीस दिली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. महापालिकेकडून दोन महिन्यांपूर्वीच नोटीस बजावली असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इतर अतिक्रमणे दुर्लक्षित
दोन नामवंत बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, शिक्षण संस्थेने करारावर घेतलेल्या जागेचे पक्के बांधकाम आणि रस्त्यावरील एका मंदिराच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का केले, असा आरोप नागरिकांनी केला.
व्यावसायिक बांधकामांकडे दुर्लक्ष : तपोवनपरिसरातील दहा वर्षांत साधुग्रामच्या जागेसह तपोवन परिसरात व्यावसायिक बांधकामे झालीत. याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तीन जेसीबीने संसार उद‌्ध्वस्त : दहावर्षांपूर्वीचा संसार अवघ्या पंधरा मिनिटांत जमीनदोस्त झाल्याचे पाहून महिलांनी हंबरडा फोडला. तान्ह्या मुलाची तरी दया करा, असे महिला सांगत होती. पोलिसांनी तिची समजूत काढत जेसीबीपासून दूर नेले.
उद्‌ध्वस्त झाल्याची भावना
तपोवनातील मूळ जागा मालकाने १० भाडेकऱ्यांंना ९९ वर्षांचा करार करून देत त्यापोटी मोठी रक्कम घेतली होती. त्यापूर्वीच महापालिकेने जमीन हस्तांतरित केल्याची माहिती या मालकाकडून दडवण्यात आल्याने आपला संसार उद्‌ध्वस्त झाल्याची भावना या घरमालकांनी व्यक्त केली.