आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगला पाऊस दे, कुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं देवाकडे साकडं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाणीज येथील स्वामी नरेंद्र महाराज यांचा सन्मान करण्यात आला. - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाणीज येथील स्वामी नरेंद्र महाराज यांचा सन्मान करण्यात आला.
नाशिक - शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कुंभमेळ्यासाठी दर 12 वर्षांनी व्यवस्था करावी लागते. त्यामुळे या सोहळ्यासाठी कायमस्वरुपी जागा आरक्षित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात केली. दरम्यान, राज्यावर दुष्काळाचे संकट ओढावत असल्याने चांगला पाऊस पडू दे असं साकडंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी देवाकडे घातलं.

यावेळी हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीने उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी केंद्रीय अायुष मंत्री श्रीपाद नाईक अाणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जगदगुरु शंकराचार्य नरेंद्राचार्य महाराज, जगदगुरु शंकराचार्य हंसदेवाचार्य महाराज, अाखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज, वलजलभाचार्य महाराज, श्री महंत कृष्णदास महाराज, श्री महंत धरमदास महाराज, श्री महंत राजेंद्रदास महाराज, खासदार हेमंत गाेडसे, अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापाैर अशाेक मुर्तडक, उपमहापाैर गुरुमितसिंग बग्गा, गुरुमाऊली अण्णासाहेब माेरे आणि तिन्ही अाखाड्यांचे महंत तसेच हजाराे भावीक उपस्थित होते.

यंदा गर्दी टाळण्यासाठी ३५०० मीटरचे घाट बांधण्यात अाले असून सर्व शाहीस्नान साेहळे निर्विघ्नपणे पार पडतील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यंदाचा कुंभमेळा निसर्गाला समर्पित असलेला हरीतकुंभ करायचा असून सर्वांनी त्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

कोण काय म्हणाले...
जगातला सगळ्यात माेठा इव्हेंट आयोजित करताना थाेडेफार वादविवाद झाले तरी ते क्षम्य असतात. काहीवेळा ग्यानदास महाराजांशीदेखील मतभेद झाले, मात्र काही काळाने तेदेखिल दूर झाल्याचे कुंभमंत्री अाणि पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.

तब्बल बारा वर्षानंतर हाेणाऱ्या ज्या क्षणाची सगळे जण वाट पहात हाेते, ताे क्षण अाज अाला असल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी सांगितले.

शंकराचार्य हंसदेवाचार्य ‘मी इथे अाला, मला अानंद झाला’ असे मराठीत बोलले. जल पवित्र तर अन्न पवित्र तरच मन पवित्र अाणि तरच जीवन पवित्र राहू शकते. त्यामुळे जल पवित्र राखण्याचा ध्यास प्रत्येकाने घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

हा कुंभमेळा दाे भाई बिछडनेके लीये नव्हे तर समाजातील प्रत्येकाचे मनाेमिलन हाेण्यासाठी असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

समाजजवीन व राष्ट्रजीवन समृद्ध हाेण्यासाठी कुंभमेळा उपयुक्त ठरणार असून साधूमहंतांच्या साेयी, सुविधेसाठी केंद्र सरकारकडून सर्वाेताेपरी प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास केंद्रीय अायूष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.

वेदमंत्रांसह ध्वजपूजन
पहाटे साडेचारपासूनच शांतीसुक्तपाठ, पुण्याहवाचन, वरुण -इंद्र देवता पूजन अाणि सिंहस्थ प्रधान संकल्पास प्रारंभ झाला. स्तंभपूजन अाणि ध्वजपूजनाचा साेहळा भालचंद्रशास्त्री शाैचे, चंद्रशेखर पंचाक्षरी, सतीश शुक्ल, शेखर शुक्ल, दत्तात्रय भानाेसे, दिनेश गायधनी, अमीत पंचभय्ये, अतुल पंचभय्ये या पुराेहीतांच्या उपस्थितीत वेदमंत्रांसह शास्त्राेक्त पध्दतीने पार पडला.
पुढील स्लाइड्सवर, त्र्यंबकेश्वरनगरीत थाटात झालेले सिंहस्थाचे ध्वजारोहण, राजनाथ सिंग आणि यांनी केली ध्वजस्तंभाची पुजा... देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेही पोहोचल्या दर्शनासाठी... आणि संबंधित PHOTOS