आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kusumagraj Foundation By Thursday Theatrical Fun

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गुरुवारपासून नाट्यपर्वणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने हाेणाऱ्या नाट्य अभ्यास वर्गात यंदा प्रकट मुलाखत, अभिवाचन अाणि नाट्यव्याख्यान अशी नाटकाशी संबंधित पर्वणी नाशिककरांना साधता येणार अाहे. गुरुवार (दि. १) पासून हाेणाऱ्या या कार्यक्रमात अतुल पेठे, माेहित टाकळकर अाणि अाशुताेष पाेतदार हे मान्यवर सहभागी हाेणार अाहेत. विनामूल्य असलेल्या या अागळ्यावेगळ्या नाट्यपर्वणीला नाशिककर रसिकांसह नाट्यवर्तुळाने उपस्थित राहावे, असे अावाहन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले अाहे.

कार्यक्रम : ‘अाजची भारतीय रंगभूमी : एक दृष्टिक्षेप’ या विषयावर व्याख्यान
व्याख्याते: अाशुताेषपाेतदार
स्थळ: स्वगतसभागृह
वेळ: रविवार,दि. अाॅक्टाेबर, सायंकाळी वाजता

अाशुताेष पाेतदार यांचा परिचय : नाटककार,कवी अाणि संशाेधक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अाशुताेष पाेतदार यांची अानंदभाेग माॅल, एफ १/१०५ ही अलिकडच्या काळातील मराठीतील महत्त्वाची नाटकं अाहेत. अानंदभाेग माॅल या नाटकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार तर एफ १/१०५ला बाेधी नाट्यपरिषदेचा अश्वघाेष पुरस्कार देण्यात अाला अाहे. याशिवाय त्यांनी इंग्रजीतून मराठी भाषांतरेही केली अाहेत. सध्या ते फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे येथे अध्यापन करतात. नावल लाइफ, कामवाल्या बाया, पुलाखालचा बाेंबल्या मारुती या नाटकांमुळे ते विशेष प्रकाशझाेतात अाले अाहेत.
..असे हाेणार कार्यक्रम
{ कार्यक्रम : महेशएलकुंचवार यांच्या ‘त्रिबंध’ या ललित लेखसंग्रहातील ‘यथा काष्ठ काष्ठ च’ या लेखाचे वाचन, नाट्यानुभव
सादरकर्ते: प्रसिद्धदिग्दर्शक माेहित टाकळकर
स्थळ: स्वगतसभागृह
कालावधी: ८५मिनिटे
वेळ: शनिवार,दि. अाॅक्टाेबर, सायं. वाजता
माेहित टाकळकर यांचा परिचय : यू.के.मधून नाट्याभ्यास करून अालेले, तसेच ‘उणे पुरे शहर एक’, ‘एफ वन झिराे फाइव्ह’, ‘ययाती’, ‘काॅम्रेड कुंभकर्ण’, ‘गजब कहाणी’, ‘तू’, ‘कश्मीर कश्मीर’, ‘गार्बाे या सकर’ अशा िवविध नाटकांमुळे रसिकांना माेहित करणारा एक गुणी दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती.
{ कार्यक्रम : प्रकटमुलाखत
पाहुणे: नाट्यदिग्दर्शक,रंगकर्मी अतुल पेठे
मुलाखतकार: लाेकेशशेवडे, रश्मी काळाेखे अाणि अभिषेक रहाळकर
स्थळ: विशाखासभागृह

वेळ: गुरुवार,दि. अाॅक्टाेबर सायंकाळी वाजता.
अतुल पेठे यांचा परिचय : नाशिकमध्येप्रयाेग परिवारची नाट्य चळवळ, प्रायाेगिक रंगभूमीवर गाजलेल्या ‘सत्यशाेधक’, ‘वेटिंग फाॅर गाेदाे’, ‘अाषाढातील एक दिवस’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘अानंद अाेवरी’, ‘चाैक’ या नाटकांचे दिग्दर्शक अाणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रायाेगिक नाटक पाेहाेचविणारे मूळचे नाशिकचे रंगकर्मी. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘नाटकवाल्याचे प्रयाेग’ या पुस्तकाच्या निमित्ताने गप्पागाेष्टीही हाेणार अाहेत.