आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kusumagraj Foundation News In Marathi, Issue At Nashik, Divya Marathi

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमांतर्गत कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दि. 27 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांत दि. 27 रोजी पहाटे 5 वाजता अनिल दैठणकर यांचे व्हायोलिन वादन व कृष्णेंद्र वाडीकर यांचे शास्त्रीय गायन, दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजता स्वभाव नाटक दल निर्मित ‘विस्थापन’ या विषयावर ‘मि. इंडिया’ हा एकांक, दि. 1 मार्चला अभिजित ताम्हणे यांचे ‘आधुनिक चित्रकला ते समकालीन दृष्यकला’ हे सचित्र व्याख्यान, दि. 2 रोजी ‘गीत नवे गाईन’, दि. 3 रोजी ‘कादंबरीचा शोध’ या विषयावर व्याख्यान, दि. 4 रोजी ‘नाद आणि लय’, दि. 5 रोजी ‘शब्दांचेच धन’, दि. 6 रोजी एकपात्री अभिनय स्पर्धा, दि. 7 रोजी सुरजित पातर यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार वितरण, दि. 8 रोजी छंदोमयी कवयित्री संमेलन, दि. 9 रोजी ‘एक योगकथा’ एकांकिका, तर दि. 10 रोजी सायंकाळी 6 वाजता कालिदास कलामंदिरात गोदावरी गौरव सोहळा होणार आहे.कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.